आजकालच्या गतिमान आणि धकाधकीच्या जीवनामध्ये चेहऱ्याची त्वचा सैल पडणं, कमी वयातच चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसणे, मुरुम-डाग यासारख्या समस्यांचा आपल्यापैकी कित्येक जण सामना करत असतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण घरच्या घरीही रामबाण नैसर्गिक उपचार करू शकता.
आणि या बद्दलच आज आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत काही टिप्स आणि उपाय..! आपला चेहरा चमकदार आणि सुंदर दिसावा, यासाठी अनेक जणी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार ट्राय करतात. केमिकलयुक्त ट्रीटमेंटपासून ते नैसर्गिक उपचारांपर्यंत; त्वचेवर सर्व प्रकारचे प्रयोग केले जातात. पण केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टच्याअति बेसुमार वापरामुळे त्वचेचं भरपूर नुकसान होतं.
त्वचेला पोषण तत्त्वांचा योग्य प्रमाणात पुरवठा होण्यासाठी नैसर्गिक -आयुर्वेदिक उपचारांची मदत घ्यावी लागते. यापैकीच एक जबरदस्त उपाय म्हणजे मसूर डाळ. नितळ व चमकदार त्वचेसाठी आपण मसूर डाळीचे फेस पॅक /उटणं तुम्ही वापरू शकता. पाहुयात कसे बनवायचे हे उटणे.. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी मसूर डाळ पावडर, एक वाटी बेसन, दोन चमचे तांदूळ पिठी, अर्धा चमचा हळद.
हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. तांदूळ पिठी मुळे स्क्रापिंग होऊन त्वचा तरुण राहण्यात मदत होते. हळदीने डाग जाऊन त्वचा सतेज होईल. मसूर डाळीने तुमचा चेहरा मऊ होईल. हे मिश्रण एका बाटलीत भरून ठेवा. दोन चमचे हे उटणे घ्या. यात दोन चमचे लिंबाचा रस घाला. एक दोन चमचा दही घाला. अर्धा चमचा खोबरेल तेल घाला. हे मिश्रण नीट मिक्स करून पूर्ण चेहऱ्यावर दहा मिनिटांसाठी लावा. यानंतर अंघोळ करा.
हे उटणं तुम्ही पूर्ण शरीराला देखील लावू शकता. हे १००% खात्रीशीर काम करेल. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. टिप्स : १. या उटण्यामुळे त्वचेवर जमा झालेले धूळ-मातीचे कण, दुर्गंध स्वच्छ होण्यास मदत मिळते. २. मसूर डाळीची पावडर, तूप आणि मध एकत्र घ्या व जाडसर पेस्ट तयार करून चेहरा, मान, हात, पाय, कंबर आणि अन्य अवयवांच्या त्वचेवरही ही पेस्ट लावा. यामुळे त्वचेवरील डाग, टॅन कमी होतील.
३. मसूर डाळीमुळे तुमच्या फक्त त्वचेला फायदा होतोच असे नाही तर चेहऱ्यावरील अनावश्यक केसही कमी होतात. ४. सर्व प्रकारच्या त्वचेला सूट होईल से हे उटणे आठवड्यातून दोन वेळेला तरी नक्की वापरावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.