केस आपल्या व्यक्तिमत्त्वावर खूपच परिणाम करतात. दाट, काळेभोर केस सगळ्यांनाच आवडतात. पण आपल्या खाण्यापिणाच्या वेळा बदलल्यामुळे आणि धावपळीच्या जीवनामुळे आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व जपायला वेळच मिळत नाही. आणि जपायचा प्रयत्न जरी केला तरी आजकाल बाजारात मिळणारी रासायनिक उत्पादने, केसांचे शाम्पू , कंडिशनर, जेल यांमुळे केसांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या सगळ्या रासायनिक उत्पादनांचा वापर करून केस तात्पुरते छान दिसतात पण त्यांचे आरोग्य बिघडत असते. यासाठी आपण शक्यतो घरगुती उपाय केले पाहिजेत. तुम्हाला माहीतच असेल केसांची वाढ होण्यासाठी, केसातील कोंडा घालवण्यासाठी , केस चमकदार आणि मुलायम करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. तसेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक खूप प्रभावी घरगुती उपाय.
कढीपत्ता. हो कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कढीपत्ता नीट सुकवून त्याची अर्धी वाटी पाने काढून घ्या. आणि त्यात खोबरेल तेल घाला. तसेच त्यात मेथीचे दाणे घाला. आणि हे मिश्रण गॅस वर ठेवून उकळवा. कढीपत्ता लालसर होईपर्यंत हे उकळवून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की हे तेल तयार झाले आहे. हे तेल वापरताना शक्यतो कोमट करूनच घ्यावे.
तेल कोमट करून केसांना लावल्यास ते केसांवर जास्त घासावे लागत नाही. कोमट असल्याने ते लगेच केसात जिरते. अशाप्रकारे केसांना पोषण मिळाल्याने केस मजबूत होतात. थंड तेल केसांना लावल्याने ते जास्त वेळ मालिश करावे लागते. पण अशाप्रकारे जास्त मालिश केल्याने सुद्धा केस तुटू लागतात आणि गळतात सुद्धा. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B आणि व्हिटॅमिन E असते.
जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. केसगळती, कोंडा आणि पांढरे केस, कोरडे केस ही केसांची समस्या अगदी सर्वसाधारण आहे. या सगळ्यावर कढीपत्ता अत्यंत गुणकारी आहे. नारळ तेलामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
हे तेल लावल्याने कोंडा, कोरडेपणा अशा समस्यांपासून मुक्त करण्यात हे प्रभावी आहे. मेथीचे दाणे केसांच्या मुळाला मजबूत करून निर्जीव केसांना पुनर्जीवित करतात. म्हणूनच हे तेल केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.