फक्त तीन दिवस गरम पाणी प्या, आपोआप वजन उतरू लागेल.!

आरोग्य

अनेकदा आपण बघतो आपले वजन काही केल्या कमी होत नाही. दिवसभरात जास्त काही खाल्ले नाही तरी वजन वाढतच जाते. आणि आपण खूप उपाय करत राहतो. याला जबाबदार बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या चूकीच्या वेळा, व्यसन, अस्वच्छता, अपुरी झोप ही कारणे कारणीभूत असू शकतात. पण तुम्हाला माहित आहे का की फक्त गरम पाणी प्यायल्याने आपले वजन कमी होऊ शकते.

पाणी शरीरात थर्मोजेनेसिसचं प्रमाण वाढवतात, जे पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करते. तसेच पाण्यामुळे शरीरात चरबी सुद्धा एकत्र राहत नाही. गरम पाणी पचनशक्ती सुधारून, बंद नाकाला पुन्हा सुरू करण्यापासून आजारपणात आपल्या शरीराला आराम देण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये खूपच उपयुक्त ठरते. भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं, ज्यामुळे पचनक्रिया योग्यप्रकारे होते.

हे वाचा:   रोगांशी लढायचे आहे का.? तर रोज जेवढे जास्त होईल तेवढे या पानांचे सेवन करा, रोगप्रतिकारक शक्ती मध्ये जबरदस्त वाढ होईल.!

पाणी पित राहिल्याने भूक कमी लागते किंवा सतत खाण्याची सवय कमी होते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करावी आणि रात्री झोपतानाही गरम पाणी प्यावं असं अनेकजण आपल्याला सांगतात. गरम पाणी झोपण्यापूर्वी प्यायल्याने आपले अन्न पचन सुरळीत होते. आणि त्याचवेळी सकाळी गरम पाणी प्यायल्याने पोट नीट साफ होते.

गरम पाणी पिण्याचे खूप फायदे असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि कफ-सर्दीसारखे आजार लवकर दूर होतात. इतर वेळी पाणी पिताना शक्यतो ते जेवणाच्या एक तासानंतर प्यावे यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते. आपल्याला माहीतच असेल, पोट साफ असल्याने अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात. वात, पित्त, कफ हे सुद्धा नियंत्रणात राहतात.

शिवाय आपली त्वचा टवटवीत राहून सौंदर्य खुलते. या सगळ्यामुळे आपण सकारात्मक राहतो तसेच शरीर सुदृढ राहते. त्वचेवरील पुटकुळ्या, मुरूम, काळे डाग अशा समस्या दूर होतात. शरीर शुद्धीमुळे त्वचा उजळू लागते. पाणी शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्याचे कार्य करते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही दररोज सकाळी न चुकता पाणी पिणं कधीही चांगलं ठरू शकतं.

हे वाचा:   आयुर्वेदातील संजीवनी समजली जाणारी ही वनस्पती, 99% लोक याला गवत समजून फेकून देतात.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *