या सोप्या पद्धतीने करा गावरान ठेचा.. चव अशी की पुन्हा पुन्हा मागाल.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला गरमागरम मस्त गावराण ठेचा कसा करायचा हे सांगणार आहोत. तर इथे सगळ्यात आधी हिरव्या हिरव्या गार मिरच्या घ्यायच्या आहेत, छान लवंगी मिरच्या घ्यायच्या आहेत. तर आता ह्या मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत.

या भाजण्यासाठी आपल्याला लोखंडी तवा इथे घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही अल्युमिनियमचा तवाही वापरू शकता. याच्यात खूप छान ठेचा बनतो. छान मिरच्या ह्याच्यात भाजून निघतात.

आता ह्याच्यामधे आधी तुम्हाला जराही तेल ऍड करायचं नाही. आता आपल्याला मिरच्या अशाच भाजून घ्यायच्या आहे. जर तुम्ही आता लगेच तेल ऍड केल तर मिरच्या उडण्याची शक्यता आहे. तर गॅस मिडीयम ठेऊन, आपल्याला छान प्रकारे या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर यांनतर तुम्ही बघू शकाल की याचा टेक्सचर किती चेंज झालेला असेल आणि याचा कलर पण चेंज झालेला असेल. छान अशा मिरच्या आपण भाजून घ्यायच्या आहेत.

हे वाचा:   खोबऱ्याचं वाटण न घालता खतरनाक टेस्टी चिकन करी एकदा नक्की करून बघा.!

त्यांनतर आता इथे लसणाच्या छान मोठ्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. साधारण आठ ते नऊ पाकळ्या लसणाच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर आता हे सुद्धा आपण मिरच्या सोबत छान भाजून घ्यायच आहे आणि आता तुम्ही थोडंसं तेल टाकू शकता. आता तेलामध्ये हे खूप छान पद्धतीने रोस्ट होईल. त्यांनतर आता तुम्हाला गॅस बंद करायचा आहे.

आता हा ठेचा ठेचायला एक छान पद्धत असते. त्यासाठी तुम्हाला इथे वरवंटा घ्यायचा आहे. यामधे तुम्हाला तुम्ही भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकायचा आहे. त्यांनतर तुम्हाला यावर मोठ मीठ तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे. त्यांनतर यामधे तुम्हाला थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकावी लागणार आहे.

एकदा का तुम्ही या सगळ्या वस्तू वरवंट्या मधे टाकल्या की मग तुम्हाला ते व्यवस्थित ठेचून ठेचून बारीक करायचं आहे. अशा पद्धतीने आपला गरमागरम हिरव्या लवंगी मिरच्यांचा झणझणीत ठेचा तयार होईल.