हाडांमधून कटकट असा आवाज येतो आहे, सांधेदुखीचा खूप त्रास होत आहे, जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर अशा प्रकारची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. आज पासून तुम्ही आम्ही सांगत असलेले उपाय फॉलो करायला हवेत, या उपायांमुळे तुम्हाला नक्कीच काहीतरी फायदा होईल चला तर मग सुरु करूया.
अनेकदा आपण चालताना उठताना बसताना हाडामधून कटकट असा आवाज येत असतो. अशावेळी आपल्या मनामध्ये खूप भीती निर्माण होत असते की आपल्याला नेमके झाले तरी काय आहे. अशा प्रकारे येणारा आवाज अनेक लोकांना वाटत असते की हाडे कमजोर झाल्यानंतर येत असतो. जर हाडांमधून कटकट असा आवाज येत असेल व तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या होत नसेल तर.
तर समजून जावे की तुम्हाला काहीही झालेले नाही. हाडांमध्ये वायू जास्त असल्यामुळे अशा प्रकारचा आवाज येत असतो. परंतु तुम्हाला याचे लवकरात लवकर इलाज करणेदेखील गरजेचे आहे नाहीतर यामुळे काही भयंकर समस्या देखील निर्माण होऊ शकतात. परंतु जर तुमचे वय हे वाढले जाऊ लागले आहे व तुमच्या हाडांमधून अशा प्रकारचा आवाज येत आहे तर तुमच्या हाडांमध्ये लुब्रिकेंट कमी झाले आहे.
या सर्व समस्यांवर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक छोटासा उपाय घेऊन आलो आहोत. या उपायाने अशा प्रकारच्या सर्व समस्या कायमच्या नष्ट होतील. चला तर मग पाहूया कसा करायचा आहे हा उपाय. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मेथी दाण्याची गरज भासणार आहे. मेथीदाण्याचे आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारचे फायदे सांगितले जातात.
हाडांच्या मजबुतीसाठी मेथीदाणे खूपच उपयुक्त मानले गेले आहेत. तुम्हाला याचे सेवन करायचे आहे परंतु आम्ही सांगितल्याप्रमाणे. दररोज रात्री झोपताना दोन ते तीन चमचे मेथी दाणे हे भिजत घालायचे आहे. अशा प्रकारे भिजू घातलेले हे मेथी दाने सकाळच्या वेळी चावून खायचे आहे व वरून गरम पाणी प्यायचे आहे.
अशा प्रकारे तुम्हाला जवळपास एका महिन्यापर्यंत करायचे आहे. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.