अनेकदा दाता संबंधीच्या विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. तुम्हालाही जर अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असेल जसे की कोणताही एखादा गोड पदार्थ खाल्ला तर अचानकपणे झिणझिण्या येणे. दात किडणे, दात सडणे, नेहमी दात दुखी होणे, जेवल्यानंतर नेहमी दात दुखत राहणे, थंड पाणी पिल्यावर दाताला ठणका मारणे.
अशा प्रकारच्या विविध समस्या जर तुम्हालाही होत असतील तर आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक खास सोपा असा उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय अत्यंत सोपा असून तुम्ही अगदी सहजपणे घरगुती पद्धतीने करू शकता. या उपाया द्वारे दाता मधला किडा सहजपणे बाहेर येईल. तसेच दात दुखी च्या सर्व समस्या मुळापासून नष्ट होतील.
चला तर मग पाहूया कोणता आहे हा उपाय. यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे व कशा प्रकारे करावा लागेल हा उपाय हे सर्व आपण सविस्तरपणे पाहूया. आपल्याला दात दुखी ची समस्या नष्ट करायची असेल तर आपल्याला काही वस्तूंची आवश्यकता असेल. तर सर्वप्रथम आपल्याला वावडिंग लागणार आहे. वावडिंग च्या बिया ह्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानल्या जातात.
या बिया दिसण्यासाठी अतिशय बारीक असतात. या घरातल्या काळया मिऱ्या प्रमाणे दिसत असतात. या बिया आपल्याला एक वेळच्या उपायासाठी अर्धा ते एक चमचा लागणार आहे. या बिया घेऊन या थोड्याशा ताकामध्ये भिजत घालाव्या. साधारणतः अर्ध्या तासापर्यंत भिजत घातल्या नंतर त्याला उन्हामध्ये वाळू घालावे.
वाळलेल्या या बिया एका सुती कपड्यांमध्ये बांधून त्याची पुरचुंडी बनवावी. त्यानंतर ही पुरचुंडी जो दात दुखत आहे त्यावर धरून ठेवावी. तुम्हाला तोंडामध्ये लाळ आलेली दिसेल ही लाळ न गीळता बाहेर थुंकून टाकावी. हा उपाय तुम्ही काही दिवस केला तर दात दुखी च्या सर्व समस्या नष्ट होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.