झोपण्यापूर्वी कोमट पाणी करून त्यात ही एक गोष्ट टाकून प्या; काहीही खा पचन होणार, सर्दी खोकला रात्रीतून पळून जाणार.!

आरोग्य

आरोग्य ही एक प्रक्रिया आहे. आपण एका दिवसात निरोगी होऊ शकत नाही. बर्‍याच लहान गोष्टी तुम्हाला निरोगी बनवतात. उदाहरणार्थ, दिवसाला एक ते दोन लिटर पाणी पिल्याने आपण निरोगी राहता. पूर्ण पोट साफ राहते. त्याचबरोबर सकाळी कोरफड किंवा आवळ्याचा रस सेवन केल्यास आपणास अनेक आजारांपासून वाचवतो.

भारतात जेवणामध्ये अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. तुम्ही सुद्धा हळद, मिरी, ओवा, लवंग अशा अनेक मसाल्याच्या प्रकारांचा उपयोग करतच असाल. पण यांचा अनेक आयुर्वेदिक उपचारात वापर केला जातो. त्याचप्रमाणे झोपायच्या वेळे आधी गरम पाण्यासोबत लवंगाचे सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहते. लहानशी दिसणारी लवंग सर्व प्रकारच्या औषधी गुणांनी परिपूर्ण आहे.

त्यात इतर अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. ज्यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, फोलेट, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, थायमिन, व्हिटॅमिन डी, ओमेगा फॅटी ऍसिडस् आहेत. आज आम्ही सांगणार आहोत याचे फायदे. गरम पाण्यासोबत लवंगाचे सेवन: झोपायच्या आधी लवंगाचे गरम पाण्यासोबत सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अतिसार, आंबटपणा यासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते, यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते.

हे वाचा:   जाणून घ्या पूर्वीचे लोक कांद्याला फोडूनच का खात होते; काय आहे यामागील सत्य.!

लवंगमध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा घटक असतो. यात सॅलिसिलेटचा एक प्रकार आहे जो मुरुम रोखण्यास मदत करू शकतो. पोटातील जंताची समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भोगावी लागते. या जंतांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर पोटात वेदना होतातच पण आपल्या शरीराला देखील मोठा धोका निर्माण होतो. यावर आपण लवंग खाऊ शकता.

कोमट पाण्याने लवंगाचे सेवन केल्यास दातदुखीपासून आराम मिळतो. आपण दातावर लवंगा देखील ठेवू शकता, ज्यामुळे दाताचे दुखणे थांबते आणि आराम मिळतो. लवंगामुळे घसा खवखवणे आणि वेदना कमी होण्यास मदत होते. ज्यांचे हात पाय थरथरतात, त्यांनी एक दोन लवंगाच्या पाकळ्या खाव्यात. यामुळे तुम्ही त्रासापासून मुक्त व्हाल.

लवंगाच्या तेलात अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्सपासून सुटका मिळण्यास याचा फायदा होतो. पिंपल्स चेहऱ्यावर पसरत देखील नाहीत. चेहऱ्यावरील डाग दूर होतात. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंगाचा फायदा होतो. लवंगाचा नियमित वापर केल्यास या समस्येपासून सुटका मिळेल. बहुतेक लोकांना हाडांची समस्या असते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. ऑस्टियोपोरोसिसमुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.

हे वाचा:   पोटाची वाढत्या चरबीचा ब्रेक लावायचा असेल तर या पाण्या शिवाय पर्याय नाही.! अनेक लोक वाढलेले पोट कमी करून खुश आहेत.!

अभ्यासानुसार लवंगामध्ये आढळणारे युजेनॉल हाडांची घनता वाढवते आणि त्यांना बळकट करते. लवंगामधील मॅंगनीझ हाडांमध्ये रचनात्मक विकास करते. दररोज पाकळ्याचे सेवन केल्यास तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते. लवंगात असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते. आयुर्वेदात मधुमेहावर लवंग लाभदायी असल्याचे सांगितले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लवंग लाभदायी ठरते.

लवंगामुळे आपल्याला खोकला, सर्दी, विषाणूजन्य संसर्ग, ब्राँकायटिस, सायनस आणि दमापासून मुक्त होण्यास मदत होते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *