कानातला मळ झटपट बाहेर येईल, फक्त टाकावे लागतील हे दोन थेंब.!

आरोग्य

कान हे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय मानले जाते. एक दिवस जरी सर्दीने आपल्याला कमी ऐकायला येत असेल तरी आपला जीव कासावीस होतो. आता कायमचंच ऐकायला येणार नाही की काय? असे काळजीचे प्रश्न पडत राहतात. तसेच ज्या व्यक्ती साफसफाईची कामे करतात, सतत धुळीत कामे करतात किंवा बांधकाम करत असलेल्या व्यक्ती यांचा कानात सिमेंट मुळे मळ साचते.

अशा व्यक्तींचे कान चावत राहतात, कानात खाज येत राहते आणि मग या व्यक्ती कानात माचीसची काडी, पेन्सिल अशा काहीही वस्तू घेऊन कानात घालतात आणि खाजवत राहतात. पण याचे दुष्परिणाम सुद्धा दिसून येतात. काडी कानात लागते आणि जखम सुद्धा होऊ शकते. तसेच या काडीने कानातला सगळा मळ बाहेर येत नाही, उलट तो अजून आत जात राहतो. आणि आपल्याला ऐकायला कमी येऊ लागते.

काही काळाने कानात पुरळ, फोडया देखील येऊ लागतात. त्यासाठीच आज आपण सोपा घरगुती उपाय बघणार आहोत. आपल्याला घरीच हे तेल बनवायचे आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तिळाचे तेल, लसूण पाकळ्या, कडुलिंबाची पाने. तिळाचे तेल किंवा कोणतेही तेल घेऊन ते थोडे गरम करावे.

हे वाचा:   आयुष्यात कधीही ऐकल्या नसतील ह्या किचन टिप्स.! कामे आता झटपट होतील.! या दहा किचन टिप्स प्रत्येक गृहिणीला माहिती असाव्या.!

यात शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करू नये. हे तेल गरम होताना त्यात चार पाच लसूनच्या पाकळ्या तुकडे करून टाकाव्यात. लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही, तर याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. शक्यतो या पाकळ्या कापून न टाकता, कुटून टाकाव्यात, यामुळे लसणाचा गुणधर्म तेलात उतरला जातो.

लसूणाचा रंग गडद लाल होईपर्यंत हे तेल गरम करा आणि त्यात कडुलिंबाची दोन चार स्वच्छ सुकवलेली पाने टाका. आणि उकळवा. हे तेल गाळून एका बाटलीत ठेऊन द्या. आणि तुमचा कान दुखत असेल, खाज येत असेल किंवा कानाचा कोणताही त्रास होत असेल तर या तेलाचे दोन थेंब कानात टाका.

जर तुम्हाला कान साफ करायचे असतील तरीसुद्धा या तेलाचा तुम्ही वापर करू शकता. दर पंधरा दिवसातून तुम्ही हे तेल कानात घालू शकता. लसणात अ‍ॅण्टिबॅक्टेरियल गुण आहेत. यामुळे कानात खाज येत असेल तर ती कायमची निघून जाते. तेलाने कान साफ राहण्यास मदत होते. कडुलिंबाच्या पानांमुळे कानातील जंतुसंसर्ग निघून जातो.

हे वाचा:   टक्कल पडलंय? चिंता सोडा.! हा एकच नैसर्गिक उपाय केस आणून देईल.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *