बरेच लोक दोनदा ब्रश देखील करतात, तरीही त्यांचे दात पिवळे असतात. बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक उत्पादनांमुळे दातांना अधिक नुकसान होऊ शकते. आपणास माहीतच असेल, दात हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. ज्याचे दात मजबूत त्याचे आरोग्य मजबूत.
कारण आपण जे चावतो तेच पोटात जाते. म्हणून दातांची निगा आणि सौंदर्य जपण्यासाठी अनेकजण अनेक खर्चिक उपाय सुद्धा करतात. जर आपले पिवळे दात असतील तर आपणास सर्वांसमोर लाज वाटेल. ज्याचा तुमच्या आत्मविश्वासावरही परिणाम होईल.
कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरून तोंड व दात नीट साफ करावेत. काही लोक जेवल्यावर दात ब्रश करतात किंवा मिठाच्या पाण्याने गुळण्या करतात. दात निरोगी ठेवण्यास हे उत्तम उपाय आहेत. योग्य प्रकारचा ब्रश वापरावा. दिवसातून दोन वेळा दात घासावेत. अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो.
पण खरंच हे सर्व केल्याने आपले दात निरोगी राहतात का? म्हणूनच आज आपण बघणार आहोत असे काही सोपे घरगुती उपाय, जे तुम्ही अगदी सहजपणे आणि पैसे खर्च न करता करू शकता. कडुलिंब आपल्या दातांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते.
यामुळे दात मजबूत होतात आणि कीड सुद्धा मरून जाते. कडुलिंबाचा उपयोग दात स्वच्छ करण्यासाठी फार पूर्वीपासून केला जात आहे. याचा नियमित वापर केल्यास दात आणि हिरड्या निरोगी राहतील व दातांचा पिवळसरपणा कमी होईल. केळ्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने आरोग्यासाठी केळी उत्तम असतात.
उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरसुद्धा रुग्णांना केळी खाण्याचा सल्ला देतात. तसेच पिकलेल्या केळीची साल दातांना लावली तर दात पांढरे होतात, मात्र कच्ची केळी खाल्ले तर दात काही दिवस पिवळे राहतात. पिकलेल्या केळ्यामध्ये असलेले पॉटेशिअम, मॅग्नेशिअम आणि मँगनिज दातांवर जमलेला पिवळसरपणा नाहिसा करण्यासाठी मदत करतो.
म्हणूनच पिकलेल्या केळ्याची साल घेऊन त्यावर तुमच्या टूथपेस्ट ने दात घासावेत. तुम्हाला लगेच परिणाम दिसून येईल. अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे खाण्याचा सोडा घेऊन त्यात थोडे मीठ टाकावे आणि लिंबूने हे मिश्रण घेऊन ते दातांवर चोळावे. यामुळे दातांचा पिवळेपणा निघून जातो आणि दात निरोगी राहतात.
सोड्यामुळे दात स्वच्छ राहतात, मिठामुळे हिरड्या मजबूत होतात, लिंबूमुळे दात मजबूत राहतात, म्हणूनच हा उपाय सुद्धा तुम्ही घरी करू शकता.
असे घरगुती आणि सोपे उपाय केल्याने, तुमचे दात आणि सोबतच तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.