फक्त चारच दिवसात केस लांबसडक बनतील, एकही केस गळणार नाही, केसांसाठी करा हा नैसर्गीक, स्वस्त उपाय.!

आरोग्य

मित्रांनो, आज आपण एक अश्या हेअर टोनर बद्दल माहिती बघणार आहोत की, ज्यामुळे आपली केस गळती एकदम थांबेल. आपले केस दुप्पट वेगाने वाढू लागतील. केसांना काळेपणा येईल. सोबतच आपले केस लांबसडक होतील. हे टोनर बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे (तेजपत्ता) तमालपत्र. हा मसाल्याचा पदार्थ आपण स्वयंपाकात वापरतो.

आपल्या तब्येतीसाठी हे तमालपत्र अत्यंत फायदेशीर आहे. सोबतच आपल्या त्वचेसाठी-सौंदर्यासाठी सुद्धा तमालपत्र उपयोगी आहे याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हा नैसर्गिक उपाय आहे. तमालपत्र केसातील कोंडा कमी करण्याचेही काम करतो. तसेच केस चमकदार बनवतो. पुढील वस्तू लागणार ती म्हणजे चहापूड. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारी चहापूड केस गळती थांबवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

त्वचा आणि केसांसाठी चहापूड हे एक उत्तम सौंदर्य प्रसाधन आहे. फक्त ते वापरावे कसे हे योग्य रित्या माहीत असले पाहिजे. ब्लॅक हेड्स/व्हाइट हेड्स घालवण्यासाठी स्क्रब सारखा चहा पावडर चा वापर करता येतो. केसांना नैसर्गिक रीत्या काळे करण्यासाठी, केसांचा पोत मऊसूत होऊन केस चमकदार होण्यासाठी चहा पावडर चा वापर करतात.

हे वाचा:   मटकी पोटात जाऊन काय करते.? मटकी खाल्ल्याने काय होते.? आज सर्वांचे सगळे गैरसमज होतील दूर.!

टोनर कसे बनवावे? तमालपत्र ४-५ पान(मध्यम आकारची), ३ चमचे चहापूड, दोन ग्लास पाणी एकत्र पातेल्यात घेऊन गॅसवर उकळत ठेवावे. मिश्रणातील पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. गॅस बंद करून मिश्रण थंड होईपर्यंत वाट पहावी. एरंडेल तेल/ तीळ तेल/ ऑलिव्ह ऑइल या तीन पैकी कुठलंही एक तेल यात आपण दोन चमचे मिसळायचे आहे.

या तेलांमध्ये ओमेगा 3,ओमेगा9, विटामिन ई यांसारखे असे काही पोषक घटक असतात की जे आपल्या केसांना अत्यंत आवश्यक असतात. हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यावे. हे मिश्रण आपण एकदम मोठ्या प्रमाणात बनवून बाटलीत भरून फ्रीजमध्येही साठवू शकता. आठवड्यातून कमीतकमी तीन वेळेस याचा वापर नक्की करावा.

हे टोनर रात्री झोपताना लावून सकाळी केस स्वच्छ धुवावेत. रात्रभर लावणे शक्य नसल्यास केस धुवायच्या कमीत कमी दोन तास आधी हे केसांवर लावावे. उपाय करून फरक दिसण्यास वेळ लागेल पण हे जादुई टॉनिक नक्की काम करते. टॉनिक कसे लावावे? स्प्रे बाटलीत भरून स्कॅल्प वर फावरून लावावे. हलक्या हातानी ५-१० मिनिटे मालिश करावी. केसांना फाटे असल्यास केसांच्या शेवटी टोकावर सुद्धा हे टॉनिक पसरावे.

हे वाचा:   आजपासून तांबे, पितळाची भांडी या घरातील पेस्ट ने घासणे सुरू करा, चमक बघून तुम्हीच थक्क व्हाल.!

घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून बनवलेले हे स्वस्त आणि मस्त हेअर टॉनिक अत्यंत फायदेशीर आहे, ज्याचा तुम्हाला नक्की लाभ होईल. तेंव्हा नक्की वापरून बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *