हाता-पाया वर गाठी येऊन ते दुखणे, कंबर दुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, टाचादुखी… ब-याच लोकांना सकाळी उठल्यानंतर जमिनीवर टाचा ही टेकवता येत नाही एवढे दुखते. असं वाटतं सुई टोचत आहे. अशा दुखण्यावर बिलकुल रामबाण उपाय आहे. तोसुद्धा घरातील वस्तूंचा वापर करून..! हा उपाय तुम्ही यापूर्वी कधीच ऐकला नसेल. हा आपल्या आजीच्या बटव्यातील उपयांपैकी एक उपाय आहे.
आपण ऐकले असेल लसणाचे तेल कानात टाकल्याने कानदुखी बंद होते. असेच काही उपाय आम्ही तुमच्या सोबत शेअर करत आहोत. एक आल्याचा तुकडा सोलून छोटे तुकडे करावे, ५-६ लवंग ,१ चमचा मेथी दाणे, ½ चमचा ओवा,५-६पाकळ्या सोललेला लसूण (सांधेदुखी कमी करते ), अर्धा इंच दालचिनी तुकडा… असे जिन्नस आपल्याला उपायासाठी लागणार आहेत. शक्यतो एक लोखंडाची कढई घ्या.
नसल्यास स्टील किंवा जी असेल ती घ्या. त्यात मोहरीचे तेल टाका. हे जास्त प्रमाणात बनवून ठेवू नये. कारण सर्व मिळून खूप प्रमाणात होते. साधारण ¼ कप मोहरीचे तेल घ्यावे. ते गरम होण्याची वाट न बघता त्यात ४-५ सोललेल्या लसूण पाकळ्या, मेथी दाणे, ओवा आणि दालचिनी यात तेल कोमट असतानाच टाकावे. लवंग आपण नंतर बारीक कुटून घालावे.
हे सर्व मंद आचेवर शिजवायचे आहे. गॅस मोठा ठेवू नये. याला वेळ लागतो. मिश्रण अधून मधून ढवळत राहावे. थोड्या वेळाने यात लवंग बारीक कुटून यात घालवी. हे रात्री बनवल्यास उत्तम कारण रात्री बनवून ठेवल्यास यातील सारे जिन्नसांचा अरोमा फ्लेवर यात योग्यरित्या परिणामकारकपणे १००% उतरेल. लवंग टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटे शिजवावे. याचा रंग बदलेला आपल्याला दिसेल.
गॅस बंद करून पूर्ण रात्र तसेच बंद करून ठेवणे. नंतर वस्त्रगाळ करून गार करूनच बाटलीत भरावे. यात आपण तीळ तेलही वापरू शकता. तेल कसे लावावे : हात पाय दुखणे, शरीरावर सूज येणे, कान दुखणे पूर्ण शरीरात जिथे कुठे दुखणं आहे तिथे तुम्ही हलक्या हातानी मालिश करू शकता. गुडघेदुखी तर पळून जाईल. लगेच परिणाम जाणवेल. शरीरातील आत पर्यंत तेल जाऊन गरमी वाढवते. उब देते. गुढघ्याना वंगण मिळते.
सांधेदुखी वर रामबाण उपाय आहे..याचा कंटाळा असल्यास तुम्ही जॉईंट पेन वर आयुर्वेदिक गोळ्या घेऊ शकता तुम्हाला सारखाच परिणाम मिळेल. तुमच्या सोयीनुसार तेल बनवा किंवा जॉईंट सपोर्ट साठी गोळ्या घ्या. आरोग्याची काळजी घ्या.
माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.