आता बनवा अंडा भेंडी.! भेंडीची भाजी जर अशी बनवली तर, लिहून घ्या दोन पोळ्या जास्त खाल.!

आरोग्य

दररोज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेवण खायला आवडतच असते आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे जेवण देखील बनवत असतो. त्याचप्रमाणे भेंडीची भाजी आपण साधी बनवली असेल जास्तीत जास्त वेगळेपणा म्हणजे आपण भेंडी फ्राय करून खाल्ली असेल पण आज आपण जाणून घेणार आहोत भेंडी आणि अंड्याची भाजी कशी बनवली जाते त्याबद्दल.

चला तर मग जाणून घेऊया यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे आणि ही भाजी बनवण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला भेंडी सर्वप्रथम छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला दोन अंडी घ्यायची आहे. सोबत एक चमचा जिरे हिरवी कोथिंबीर कापून घ्यायचे आहे.

एक चमचा हळद आणि दोन लसून कापून घ्यायचे आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत भेंडी आणि अंड्याची ही भाजी बनविण्यासाठी आपल्याला काय प्रक्रिया करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक पात्र गॅस वर ठेवून घ्यायचे आहे. कोणताही टोप किंवा नॉनस्टिक तवा देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर या तव्यामध्ये मोहरीचे तेल दोन चमचे टाकायचे आहे.

जर तुमच्याजवळ मोहरीचे तेल नसेल किंवा तुम्ही मोहरीचे तेल वापरत नसाल तर तुम्ही इथे तुमच्या रोजच्या वापरातील तेलाचा देखील वापर करू शकता. त्यानंतर तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये दोन चमचे जिरे टाकायचा आहे आणि गरम करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेल्या दोन लसुन टाकायचे आहे. या दोन्ही गोष्टी थोड्याशा भाजून झाल्यानंतर आपल्याला कापून घेतलेला कांदा टाकून परत एकदा फ्राय करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी प्यायला या गोष्टीचे पाणी, अमृतासमान असते हे पाणी, फायदे ऐकले तर पायाखालची जमीन सरकेल.!

आता या गोष्टी पूर्णपणे शिजवून झाल्यानंतर यामध्ये भेंडी टाकायची आहे आणि व्यवस्थित रित्या ती शिजू द्यायचे आहे. मंद आचेवर कमीत कमी एक ते दोन मिनिटे शिजू द्यायचे आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे की, या मिश्रणाला आपल्याला झाकून शिजवायचे नाही आहे कारण झाकून शिजवली तर ती थोडीशी मऊ होते पण जर आपण न झाकता शिजवली तर ती थोडीशी क्रिस्पी होते.

म्हणून भेंडी जर आपल्याला थोडीशी खुसखुशीत हवी असेल तर ती झाकून शिजवायची नाही आहे. त्यानंतर यावर एक चमचा मसाला मीठ आणि हळद पावडर टाकून संपूर्ण भेंडीवर मिक्स करून घ्यायचे आहे आणि परत एकदा काही सेकंदांसाठी हे मिश्रण शिजू द्यायचे आहे. आता जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमची भेंडी थोड्या जास्त प्रमाणात शिजून तयार आहे म्हणजे आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची नाही आहे.

कारण यानंतर आपण अंड्यांचा देखील वापर करणार आहोत आणि अंडी शिजेपर्यंत भेंडी देखील शिजली पाहिजे कारण पहिल्यांदा आपण भेंडी पूर्णपणे शिजवून घेतली तर नंतर अंडी टाकल्यानंतर ती परत शिजणार आणि त्यामुळे भेंडी जास्त मऊ किंवा जळू देखील शकते त्यामुळे थोडा जास्त प्रमाणात शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये सर्व भेंडी एका बाजूला करून घ्यायची आहे.

हे वाचा:   सलग दहा दिवस हे लाडू खायचे शरीरात झालेला बदल बघत राहायचा.! डॉक्टर सुद्धा बघून हैराण आहेत.!

उरलेल्या बाजूला दोन अंडी फोडून त्या पाणी मध्ये टाकायची आहेत. आता पॅनमध्ये टाकलेल्या अंड्यांवर चवीप्रमाणे थोडसे मीठ टाकायचे आहे आणि तिथल्या तिथे थोड्या जास्त प्रमाणात शिजवायचे आहे आणि त्यानंतर ही अंडी आपल्याला भेंडी मध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. अंडी भेंडीमध्ये व्यवस्थितरीत्या मिक्स करायची आहेत जेणेकरून भेंडीच्या प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित रित्या अंड्याची चव येईल आता या मिश्रणाला पाच मिनिटे खूपच मंद आचेवर शिजू द्यायचे आहे.

पाच मिनिटानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावर टाकून आता ही भेंडी आणि अंड्याची भाजी खायला तयार झालेली आहे. ही भाजी चपाती भाकरी नान अशा कोणत्याही पदार्थांसोबत खाऊ शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *