स्त्री असो अथवा पुरुष सर्वांना केस पांढरे होण्याची समस्या खूपच सतावत असते. लोक नेहमी आपल्या डोक्यामध्ये असलेल्या पांढऱ्या केसांकडे बघून विचार करत असतात. संपूर्ण काळे केस असतात परंतु मध्ये मध्ये काही पांढरे केस उगवले जात असतात. तसेच अनेक तरुण मुले मुली आहेत ज्यांना तरुण पणातच केस पांढरे होण्याची समस्या दिसत आहे.
अनेकांना वाटत असते की यावर एकमेव उपाय आहे तो म्हणजे केसांना डाय करणे म्हणजे केस काळे करणे परंतु असे नाही. काही घरगुती उपाय उपाय केले तर तुम्हाला यापासून सुटका मिळवता येऊ शकते. आम्ही तुम्हाला आजच्या या लेखाद्वारे खूपच साधे सोपे असे उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांना काळे बनवू शकता.
छोटासा दिसणारा आवळा देखील आपल्या आरोग्यासाठी मोठमोठे फायदे देऊन जात असतो. केसांना काळे करण्यासाठी देखील आवळा फार उपयुक्त आहे. ज्या लोकांना केस पांढरे होण्याची समस्या आहे अशा लोकांनी आवळ्याचे सेवन करणे सुरू करावे. याबरोबरच आवळ्याचे साल यांच्या मदतीने केसांना नारळाच्या तेलाबरोबर एकत्र करून लावावेत.
अशा प्रकारे काही उपाय केले तर केस पूर्णपणे काळे होतील. कडीपत्ता देखील या केसा संबंधीच्या समस्या साठी फायदेशीर ठरेल. यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये कढीपत्त्याची काही पाने टाकावी व या पाण्याने अंघोळ करावी. तसेच केस चांगल्याप्रकारे धुवावे याबरोबरच या पानांचा बारीक कूट करून नारळाच्या तेलामध्ये एकत्र करून याने केसांची मालिश करावी.
असा हा कढीपत्त्याचा उपाय केला तर केस पूर्णपणे काळे होतील. या बरोबरच कांदा देखील या उपायासाठी फायदेशीर ठरेल. यासाठी कांद्याची पेस्ट बनवून घ्यावी व ही पेस्ट आंघोळीपूर्वी केसांना लावावी असे केल्याने केसांमध्ये असलेले कोंडा देखील निघून जातो. तसेच केस चमकदार बनतात पांढरे केस निघून जातात.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.