पोटात नुसती आग होतेय.? काही खाता येईना ना पिता येईना.! अहो मग हे दोन पदार्थ असे खा.! दहा मिनिटात मिळेल आराम.!

आरोग्य

शिळे अन्न व अवेळी जेवण या कारणांमुळे आपल्याला अपचन किंवा गॅस आणि पोटातील गरमी म्हणजेच उष्णता या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. गॅस होण्याची अनेक कारणे आहेत. जेवणानंतर लगेच झोपणे किंवा काम करणे, तळलेले तिखट, मसालेदार पदार्थ सेवन करणे. कच्चे, शिळे व करपलेले अन्न सेवन करणे, आहारामध्ये मैद्याचा वापर जास्त असणे, जेवताना घाईगडबडीत जेवण करणे, अन्न पुरेसे न चावता गिळणे, धूम्रपान, मद्यपान, तंबाखू, गुटखा, मादक पदार्थांचे सेवन करणे अशा अनेक कारणांमुळे आपल्याला त्याची समस्या होत असते व पोटामधील गरमी जास्तीत जास्त वाढते.

या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे औषधे खात असतो पण त्याने आपल्याला हवा तसा फरक दिसून येत नाही त्यासाठी आज आपण या सगळ्या समस्या वर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला बडीशेपचा वापर करायचा आहे. बडीशेप आपल्या शरीरामध्ये गॅस कमी करण्यास मदत करते.

बडीशेपमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज, व्हिटॅमिन सोबतच पोषक तत्व असतात. ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. बडीशेप अपचन दूर करते, पोटदुखी आणि श्वासासंबंधी आजारात औषध म्हणून वापरली जाते. त्यामुळे इथे आपल्याला बडीशेप चा वापर करायचा आहे. आपण इथे दोन्ही प्रकारे बडीशेप चा वापर करू शकतो जसे की थोडेसे ड्राय रोस्ट करून म्हणजेच थोडेसे हलके भाजून त्या बडीशेपचा वापर आपण करू शकतो तशी पूड बनवून त्याचा वापर करू शकतो किंवा आपण बडीशेप अशीच वापरू शकतो.

हे वाचा:   तोंडाला महागड्या क्रीम लावणं सोडून द्या हो...! त्यापेक्षा स्वस्त आणि मस्त हे आयुर्वेदिक उपाय करून चेहरा सगळ्यांपेक्षा सुंदर आणि तेजस्वी बनवा.!

आपल्याला खडीसाखरेचा वापर करायचा आहे. खडीसाखर आरोग्यासाठी उत्तम असून त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. आर्युवेदानुसार खडीसाखर ही थंड गुणधर्म असलेली आणि वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखणारी आहे. रिफाईंड साखरेपेक्षा खडीसाखर आरोग्यासाठी उत्तम असते. कारण खडीसाखरेमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अमिनो एसिड असतात त्यामुळे शरीरासाठी खडीसाखरेचा फायदा आपल्याला जास्त होत असतो. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी खडीसाखरेचा किंवा साखरेचा देखील वापर करू नये.

आजचा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम रात्री झोपण्यापूर्वी गॅसवर एका पात्रामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे बडीशेप टाकायची आहे. ही बडीशोप व्यवस्थित रित्या उकळवून घ्यायची आहे. कमीत कमी तीन ते चार मिनिटे मंद आचेवर या पाण्याला उकळू द्यायचे आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून यावर एक झाकण ठेवायचे आहे व रात्रभर हे मिश्रण असेच ठेवून द्यायचे आहे. सकाळी हे पाणी गाळून उपाशीपोटी या पाण्याचे सेवन करायचे आहे.

हे वाचा:   दातात एकही किडा किंवा दात दुखीची तक्रार उरणार नाही.! दात दुखी ची ही समस्या या घरगुती उपायाने झटपट संपेल.!

दररोज सकाळी या मिश्रणाचे सेवन केल्यामुळे गॅस होण्याची प्रक्रिया भरपूर प्रमाणात कमी होईल सोबतच पोटातील गरमी देखील हळूहळू कमी व्हायला लागेल. त्याशिवाय जर आपल्याकडे पुरासा वेळ नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास मध्ये दोन चमचे बडीशेप टाकून हे मिश्रण असेच झाकून ठेवायचे आहे आणि सकाळी या मिश्रणाचे सेवन देखील आपण करू शकतो त्यानंतर भिजून झालेली बडीशेप न टाकता त्या बडीशेप चे सेवन देखील आपल्याला करायचे आहे.

असे केल्यास आपला गॅस व पोटातील गरमी कमी होईल. यापुढे आपल्याला गॅसचा त्रास होणार नाही. या उपायांमध्ये वापरले गेलेले घटक औषधी गुणधर्मांनी भरपूर असल्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणताही हानिकारक परिणाम होणार नाही उलट फायदाच होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.