पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आमच्या या आरोग्यदायी माहिती देणाऱ्या पेज मध्ये. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला खूपच उपयुक्त अशी माहिती देणार आहोत. ही माहिती तुम्हाला आरोग्याबाबतची खूप विशेष मदत देणारी माहिती असणार आहे. आम्ही तुम्हाला एका अशा वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत जी वनस्पती शरीराच्या विविध प्रकारच्या समस्या दूर करू शकते.
आम्ही ज्या वनस्पती बद्दल बोलत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे बाभूळ. होय मित्रांनो बाभूळ वनस्पतीच्या पानांचा जेवढा उपयोग असतो तेवढाच उपयोग त्यांच्या शेंगांचा देखील केला जातो. बाभूळ च्या शेंगा या आरोग्यासाठी खूपच चांगल्या मानल्या जातात. याला आयुर्वेदामध्ये देखील विशेष महत्त्व सांगितले गेले आहे.
उन्हाळा सुरू झाला की पिवळसर रंगाची फुल गोलाकार गुच्छ पद्धतीने येत असतात. तर हिवाळा सुरू झाला की बाभळीच्या या शेंगा येण्यास सुरुवात होत असते. बाभळीचे लाकूड हे खूपच मजबूत असते. बाबळी ला विशेष म्हणजे काटे असतात हे काटे इतके भयंकर असतात की यामुळे जखम देखील होऊ शकते. बाभळीचे पाने हे आवळ्याच्या पानांपेक्षा लहान आकाराची असतात.
तुम्ही याच्या शेंगांचा विविध प्रकारे वापर केला तर आरोग्य संबंधीच्या वेगवेगळ्या समस्या यामुळे दूर केल्या जाऊ शकतात. ज्या लोकांचे हाड तुटले असेल अशा लोकांसाठी या शेंगा खूपच उपयुक्त आहेत. अनेकदा शरीराचे एखादे हाड मोडले जाते अशावेळी बाबळीच्या शेंगा घेऊन त्यामध्ये असलेल्या बिया बाहेर काढाव्या. याला चांगल्या प्रकारे वाळून त्याची पूड बनवून घ्यावी.
बाभळीच्या बियांचे बनवलेले हे चूर्ण तीन दिवसापर्यंत मधामध्ये एकत्र करून याचे सेवन केल्यास अस्थिभंग दूर होत असतो. या बरोबरच हाडे खूपच मजबूत देखील होत असतात. याच्या सेवनाने हाडे देखील लवकर जोडले जातात. हा उपाय खूपच प्रभावशाली उपाय असेल. अनेक वेळा आपले दात दुखले जात साथ अशावेळी याचा वापर केला जाऊ शकतो.
दात दुखी साठी सर्वप्रथम बाभळीच्या शेंगाचे वरील आवरण जाळून त्याची राख घ्यावी. त्यानंतर बदामाचे साल देखील जाळून त्याची राख एकत्र करावी या मध्ये थोडेसे मीठ टाकून याने आपले दात स्वच्छ करावे. असे केल्याने दात दुखीचा त्रास देखील पूर्णपणे बरा होतो. अनेक लोकांना तोंड येत असते तसेच तोंडामध्ये छाले पडले जातात.
अशा वेळी बाभळीच्या शेंगा चे बीज घेऊन त्याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यावे. याचे सेवन पाण्याबरोबर केल्यास तोंडात असलेले छाले पूर्णपणे बरे होत असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.