महिन्याभरात दहा किलो वजन वाढवा.! असा आहार घेतला तर वजन वाढणारच.! ही एक चूक करणाऱ्या लोकांचे वजन कधीच वाढत नसते.!

आरोग्य

मित्रांनो आज काल आपण आजूबाजूला बघितले तर आपल्याला अतिलठ्ठ माणसं जास्त प्रमाणात दिसून येतात. परंतु आपल्याकडे एकूण लोकसंख्येच्या सुमारे दहा टक्के लोक हे कुपोषित आहेत. कुपोषित म्हणजे अंडर वेटेड आहेत ज्यांचे वजन अत्यंत कमी आहे. अशाप्रकारच्या लोकांबद्दल अनेकदा कौतुकाने बघितले जाते. कारण लठ्ठपणाचे प्रमाण एकीकडे वाढत असताना कितीही खाल्ले तरी वजन वाढत नाही हा प्रकार मात्र वरदानच वाटतो.

परंतु मित्रांनो एक वेळ वजन कमी करणे सोपे आहे परंतु वजन वाढवणे हे खरोखरच अवघड आहे. याला अति जास्त प्रमाणात कष्ट लागतात असे म्हटले तर वावगे ठरू नये. आपल्या शरीरातील हाडे स्नायू आणि मांसल भागाचे एकत्रितरीत्या वजन असे आपल्या शरीराचे वजन म्हणतो. आपले वजन आणि उंचीचे तुलना करून बॉडी मास इंडेक्स नावाच गुणोत्तर काढले जाते. हा अंक18.5 पेक्षा कमी असल्यास अशा लोकांना अंडरवेट म्हणता येते.

म्हणजे या लोकांना वजन वाढवण्याची गरज आहे. कितीही खाल्ले तरी अंगाला लागत नाही त्याचे अंग पार्टी कशी आहे असे वाक्य आपण बर्‍याचदा ऐकतो. परंतु मित्रांनो ही देखील धोक्याची घंटा आहे. अति अशक्तपणा कमजोरी रोगप्रतिकारक्षमता, अति थकवा येणे, शारीरिक आणि मानसिक ताण तणाव, अन्नपदार्थ न आवडणे, लठ्ठपणा होण्याची भीती यामुळे अन्न न खाणे असे अनेक कारण यामागे असू शकतात.

हे वाचा:   हा आजार असणाऱ्या लोकांनी वेलची अशाप्रकारे खावी; फायदे ऐकून थक्क होऊन जाल, पोटात होणारी आग शून्य मिनिटात होईल बंद.!

मित्रांनो तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण कमी वजन असलेल्या लोकांना जास्त प्रमाणात ताण तणाव असतो. किंवा ताण घेण्याचा त्यांचा स्वभाव असतो त्यामुळे कितीही खाल्ले तरी त्यांच्या शरीराला पोषक तत्व मिळत नाही. पोषण तत्व आणि शरीर यांच्या मध्ये ताणतणावामुळे अडथळा येतो. याचा परिणाम शरीरातील पचनक्रिया व पोषकतत्व शरीरात ॲबसॉरब करणाऱ्या घटकांवर होतो. पचनसंस्था व्यवस्थित नसल्यास वजन वाढणे आणि वजन कमी होणे या दोन्ही गोष्टी दिसून येतात.

लक्षात घ्या बदल हे एका रात्रीत होत नाही तर तेव्हा धीर धरा आणि आपले वजन वाढवण्यासाठी च्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. तुम्ही इतर वेळचा नाष्टा मध्ये पोहे उपमा असे पदार्थ खाता त्या आवजे तुम्ही पौष्टिक घटक खा. काळे खजूर केळी हे घटक शरीराला अत्यंत आवश्यक आणि पौष्टिक असतात ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. दररोज सकाळ-संध्याकाळ एक कप दुधामध्ये एक चमचा साजूक तूप खावे.

वजन वाढवण्यासाठी उडदाची डाळ तुम्हाला खूप मदत करते. रात्री भिजवलेले उडदाची डाळ सकाळी तुम्ही सेवन करू शकता. हे एक पूर्णान्न आहे. आंबा केळी दुधाचे पदार्थ दूध पनीर लोणी तूप बटाटा भात चॉकलेट या वस्तू तुमचे वजन वाढविण्यासाठी मदत करतील. डार्क चॉकलेटमुळे तुमचा मूड बदलण्यास देखील मदत होते. वजन कमी करणे या विषयावर अनेकदा बोलले जाते. परंतु कमी असलेले वजन वाढवण्यासाठी फार कुणी सांगतच नाही.

हे वाचा:   एकही रुपया खर्च न करता केसातला सगळा कोंडा बाहेर काढा.! हे सहा घरगुती उपाय तुमच्या डोक्यातला कोंडा पूर्णपणे गायब करतील.!

याकरता तुम्ही दुधामध्ये दोन चमचे शतावरी पावडर मिक्स करून दररोज घ्या. आहारामध्ये मोड आलेले कडधान्य खा यामुळे तुमचे रक्त वाढण्यास मदत होईल. शक्य तेवढे कमी धावपळ करा. रात्री झोपताना 2 खारका अवश्य खा. हे शरीराला अत्यंत पौष्टिक असतात. वेळेत झोपा वेळेत उठा. कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण तणाव असल्यास त्यावर योग प्राणायाम हलका व्यायाम यांसारखे उपाय तुम्ही करू शकता.

शरीरामध्ये वात पित्त कफ हे दोष यांचे संतुलन राखा. संतुलित आहार पुरेशी झोप आणि रोजचा हलका व्यायाम हे एक आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग असायला हवे. सर्वात महत्त्वाचे पोटा संबंधित कोणत्याही तक्रारी दुर्लक्ष करू नका. स्वस्थ आणि आरोग्यदायी खा आणि मस्त राहा..तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *