नमस्कार मित्रांनो, आपल जग खूप मोठ आहे. आपला जो निसर्ग आहे त्यामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आपण होऊन उगवतात. आणि या सगळ्याच गोष्टी आपल्या जगाला खूप आकर्षित बनवतात. आज आपण अशाच एक वनस्पती विषयी जाणून घेणार आहोत. तर या वनस्पतीचे नाव आहे भूमी आवळा. या वनस्पतीची पानं ही आवळ्या प्रमाणेच बारीक छोटी छोटी असतात.
यावर छोटे-छोटे आवळ्या प्रमाणेच फळं लागलेली असतात. भूमी आवळा ही अशी वनस्पती आहे की ती आपल्या भारत देशात जागोजागी सापडते. तुम्ही शेतकरी असाल तर शेतात बऱ्याचदा आपण याचे झाड पाहिले असेल. शहरात रिकाम्या जागी खूपदा ही झाडं आढळतात. आता आपण जाणून घेउया या वनस्पतीचे काही चमत्कारिक उपाय. तुम्हाला जर तोंड आले असेल, तर या वनस्पतीचे काही पाने तोडून घ्यावीत.
स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. धुवून घेतल्यानंतर ती पाने चावा. फक्त चावल्याने तुम्हाला आलेले तोंड जाईल. जर तुम्हाला कुठली जखम झाली असेल आणि ती लवकर भरून येत नसेल तर याच्या पानांचा रस बनवून जखमेवर चोळल्यास जखम लवकर भरून निघते व ठीक होते. ही भूमी आवळ्याचे पाने पोट दुखी वर जालीम उपाय होय. यासाठी तुम्हाला याच्या पानांचा काढा बनवायचा आहे.
सकाळी काही न खाता-पिता हा काढा दररोज घेतल्याने तुमची पोट दुखीची समस्या दूर होईल. नियमित भूमी आवळ्याच्या पानांच्या काढ्याचे सेवन केल्याने पोट दुखी तर ठीक होते परंतु मधुमेहात साखर नियंत्रणात राहण्यासाठी हे फायदेशीर ठरते. किडनीमध्ये सूज असल्यास ती बरी होईल. लघवी करताना जळजळणे यावर तर हा काढा म्हणजे वरदान!
असा हा बहुगुणी काढा बनवणे अत्यंत सोपे आहे. पानांचा रस दोन ग्लास पाण्यामध्ये उकळावा. त्याच एक ग्लास पाणी राहीपर्यंत उकळा. हा काढा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपतानाही पिऊ शकता. भूमी आवळ्याची पाने तुळशीचे पाने त्यांचा सोबत काढा पिल्यास जुनाट खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो. कावीळ झाली असल्यास भूमी आवळा च्या पानांचा रस ताका सोबत पिल्याने कावीळ मध्ये आराम मिळतो.
आशा आहे की दुर्लभ माहिती तुम्हाला नक्की आवडेल. आणि ती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर कराल, धन्यवाद! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.