सतत विचार करणारे, सतत चिंता करणारे एकदा नक्की वाचा, अशा प्रकारे होत आहे तुमचेच नुकसान.!

आरोग्य

मित्रांनो, असं म्हणतात चिंता चिते समान असते. चिंता करणे हा एक असा रोग आहे जो आपल्या मनाचा सर्व आनंद हिरावून घेतो. आपण आजूबाजूला पाहिले तर खूप चिंताग्रस्त असलेला माणसे आपल्याला कधीही आनंदी दिसणार नाही. चिंतेत डुबलेल्या माणसाला कोणत्याही गोष्टीने आनंद मिळत नाही. सतत एकाच गोष्टीवर अति विचार केल्याने तुम्ही फक्त विचारच करत राहाल. असे लोक कायम एक प्रकारची उदासीनता आणि दुखी ऊर्जेने ग्रस्त असतात.

मग कोणता आनंदाचा क्षण असू दे किंवा कोणता सण-उत्सव असू देत. कोणतीच गोष्ट या अशा लोकांना आनंद देऊ शकत नाही. अशा लोकांना सतत वाटत राहतं की सगळी जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे. आणि आपण लक्ष दिले नाही तर सगळं बिघडून जाईल. परंतु हे सत्य नाही. बऱ्याच वेळा फक्त आपल्या चिंता करण्याच्या स्वभावामुळे होणारी कामं बिघडून जातात.

कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी असेल तरी त्याचा परिणाम सर्व कुटुंबावर होतो. सर्व घरांमध्ये तीच उर्जा पसरते आणि घरात कोणीच आनंदी राहू शकत नाही. मग अशा लोकांना हळूहळू ही सवय लागते आणि छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा यांना टेन्शन येऊ लागते. जो माणूस खूप जास्त चिंता करतो तो राग,चिडचिडेपणा, अशांती, बेचैनी, उशिरा रात्री पर्यंत झोप न लागणे यांसारख्या रोगांनी तो ग्रासला जातो.

हे एक सत्य आहे की, जितके तुम्ही चिंता करता त्यापैकी वास्तविक जीवनामध्ये तसं काहीच नसतं की ज्याची इतकी काळजी करावी. खूप लोक म्हणतात, आमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? आयुष्य कसं ही असू देत. जर तुम्ही समस्यांचे समाधान शोधू शकत नसाल तर तुम्ही स्वतःच एक समस्या आहात. अशी कोणती चिंता नाही की जी करण्यामुळे आपल्याला सुख मिळेल. किंवा तुमच्या घरात मनामध्ये शांती येईल.

चिंता हे एक असे वि’ष आहे ज्यामुळे तुमचे भविष्य तर कधी चांगले होणार नाहीच, परंतु तुमचा वर्तमानातील आनंदक्षण नक्कीच बरबाद करेल. चिंता काय आहे? असं होऊ नये, तसं होऊ नये. असं का होतंय? तसं का होत नाहीये? याचा सरळ अर्थ असा आहे आपण त्याच गोष्टीची चिंता करतो ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत. मग त्याच गोष्टीवर सतत विचार करून आपण कोणता स्वर्ग उभारणार आहोत? चिंते पासून दूर राहायचं असेल तर पुढील पाच गोष्टी लक्षात ठेवा.

हे वाचा:   आजपासून थकवा कायमचा गायब होईल, पृथ्वी तलावरील सर्वात शक्तीशाली वनस्पती.!

१) सर्वप्रथम उद्या काय होणार याबद्दल विचार करणं सोडून द्या. उद्या भविष्यात काय होणार याबद्दल कुणालाच माहीत नाही आणि या क्षणी तुम्ही काय करू शकता हे तुमच्या हातात आहे. सण-उत्सव आनंद या क्षणांसाठी कोणत्याही दिवसाची वाट पाहू नका. आजच्या दिवशीच उत्सव साजरा करा. वर्तमानात खुश राहण शिका.

२) ज्या गोष्टी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगल्या नाहीत त्या गोष्टी विसरून लेट्स गो करणे शिका. प्रत्येक गोष्टीत खूप जास्त डोकं चालवण्याची गरज नाही. खूप काळजी केलीत आता थोडसं निष्काळजी व्हायला शिका. मना वरून कुठलतरी ओझं उतरलं असं तुम्हाला वाटेल.

३) लोकं आणि परिस्थिती आपल्या हिशोबाने चालतील अशी इच्छा करणं सोडून द्या. लोकं जगात कधीही कोणाच्या हिशोबाने चालत नाहीत. जर आपल कोणावर नियंत्रणच नाही तर फालतू गोष्टींवर विचार करून का फुकटची अशांती विकत घेता? लोक आणि परिस्थिती कशी व्हायला पाहिजे याचा विचार सोडून द्या आणि कोणत्याही स्थितीत तुम्हाला मस्त आनंदी राहायचं आहे हे मनाशी ठाम ठरवा.

४) प्रत्येक गोष्टीत स्वतःला जबाबदार धरणे सोडून द्या. असा विचार करू नका की सगळ तुम्हालाच कराव लागत, सगळं तुम्हालाच बघावं लागतं. एक कटू सत्य जाणून घ्या, याआधीही सगळं चालू होतं आणि तुमच्या नंतरही सगळं चालूच राहील.! प्रत्येक माणूस आपली भूमिका बजावतोय. जास्त सिरीयस होण्याची गरज नाही. कोणी काहीही करू किंवा नको करू देत आपण त्यासाठी आपलं मन जड करायचं नाही.

हे वाचा:   खाज खरुज चा त्रास आता कायमचा संपणार, पुन्हा पुन्हा होणाऱ्या त्वचारोगावर करावा हा शेवटचा इलाज.!

समस्या सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. तुम्ही एकटेच नाही आहात. सगळ्यांचं हेच रडगाणं आहे. मस्त रहा स्वस्थ रहा. सगळ ठीक करण्याचा तुम्ही ठेका घेतलेला नाही. तुम्ही स्वतःला खुश आणि ठीक ठेवा हे खूप झाले. ५) बऱ्याचदा लोक आपल्या मनातील गोष्टी बोलू शकत नाहीत आणि आतल्या आत घुसमटत राहतात. यामुळे आपण कधी मनापासून खुश राहू शकत नाही. मनातल्या गोष्टी मनातच ठेवू नका. नाती तुटतील अशी आपल्या आतील भीती बाहेर काढा आणि कोणाला काय वाटेल याचा विचार न करता आपल्या मनातील गोष्टी बोलायला शिका.

नातं टिकवण्याची जबाबदारी फक्त तुमची नाही. कोणामुळे तुमचे मन अशांत असेल दुखी असेल तर आतल्या आत घुसमटण्या पेक्षा मनातल्या गोष्टी बोलून टाकायला शिका. तोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत समस्या वाढतच राहतील. नाती सांभाळण्याच्या विचारांत तुम्ही स्वतःला हरवून देऊ नका. बरोबर ला बरोबर आणि चूकला चूक म्हटल्याने कोणी तनाराज होत असेल, नातं तोडत असतील तर अशा लोकांची तुम्हीही पर्वा करू नका.

आनंदाने जीवन जगणे खूप सोपे आहे. परंतु आपण जीवन जगायलाच विसरलो आहोत. जीवनाचा एकेक क्षणाचा आनंद घेत पुढे चालत राहा. फक्त श्वास घेण्याचे नाव जीवन नाही. स्वतःला खुश ठेवणे ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. आयुष्यातील एक एक क्षणांचा सोहळा करा.. भरभरून जगा..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *