आपण पाहतो की अनेक लोकांचे फारच कमी वयामध्ये केस हे पांढरे होऊ लागतात. अशा वेळी हे लोक केसांना डाय करत असतात. परंतु डाय केलेले केस हे जास्त दिवसांपर्यंत काळे राहात नाहीत. तसेच यामध्ये केमिकलयुक्त पदार्थ असल्यामुळे हे केसांना हानी देखील पोहोचू शकते. यामुळे केस गळती होणे, टक्कल पडणे इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
मग अशावेळी काय करायला हवे हे सुचत नाही. परंतु चिंता करण्याची काही गरज नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक छोटासा सोपा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय जर तुम्ही केला तर पांढरे असलेले तुमचे केस हे पूर्णपणे काळे होऊन जातील यात काही शंका नाही. तुम्ही फक्त सांगितलेला उपाय हा योग्य प्रकारे करायचा आहे.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे ती म्हणजे मुलतानी माती. मुलतानी माती ही चेहऱ्यासाठी फार उपयुक्त मानली जाते. यामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. आपल्याला हा उपाय करण्यासाठी देखील याचा उपयोग करायचा आहे. सर्वप्रथम एक वाटी घ्यावी यामध्ये दोन ते तीन चमचे मुलतानी माती टाकावी त्यानंतर यामध्ये एक ते दोन चमचा ब्लॅक पावडर टाकावी.
आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ते नारळाचे तेल. नारळाच्या तेलामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. केसांच्या वाढीसाठी तसेच केसांना योग्य ती पौष्टिक वाढ मिळवण्यासाठी नारळाचे तेल हे फार उपयुक्त असते. नारळाच्या तेलामुळे केस गळती देखिल होत नसते. त्यामुळे नारळाचे तेल तुम्ही निरंतर केसांना लावत राहावे. या मिश्रणामध्ये तीन ते चार चमचे नारळाचे तेल टाकावे.
या सर्व मिश्रणाला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे पुढचा पदार्थ तो म्हणजे टोमॅटो. टोमॅटो घ्यावे त्याचे दोन भाग करून घ्यावे व लिंबू पिळल्याप्रमाणे त्या मधुन रस काढावा व तो रस या मिश्रणामध्ये टाकावा. याला पाच ते दहा मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे एकत्र करत राहावे. तोपर्यंत हे सर्व मित्रांना काळ्या रंगाचे होत नाही तोपर्यंत.
त्यानंतर बनवलेले हे मिश्रण केसांना चांगल्या प्रकारे लावून घ्यायचे आहे व काही वेळ तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर केस धुऊन टाकावे हा उपाय तुम्ही आंघोळीपूर्वी देखील करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.