शारदीय नवरात्र उत्सव आजपासून देशभरामध्ये सुरू झाला आहे. हिंदू धर्मामध्ये याचे खुप महत्त्व सांगितले जाते. अनेक लोक संपूर्ण नऊ दिवस उपवास करत असतात. माता लक्ष्मी च्या नावाने उपवास केला जातो. काही लोकांचा उपवास हा खूपच भयंकर असतो. काही लोक संपूर्ण नऊ दिवस केवळ उभा राहण्याचा उपास धरत असतात.
काही लोक संपूर्ण महिनाभर चप्पलच घालत नाहीत. काही लोकांचा उपवास तर असा असतो की ते लोक नऊ दिवस पाणी पीत नाहीत. या नऊ दिवसांमध्ये फलआहार केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचे सेवन या नऊ दिवसांमध्ये केले जात असते. फळे हे उपवासासाठी अतिशय योग्य मानली गेली आहे.
या नऊ दिवसांमध्ये मांसाहार अजिबात केला जात नाही. असे करणे अत्यंत चुकीचे मानले जाते. उपवासा दरम्यान किंवा उपवास न करणाऱ्या लोकांना कांदा आणि लसूण न खाण्याचा सल्ला दिला जातो. असे फार पूर्वीपासून सांगण्यात येत आहे. तसेच जर आपण आयुर्वेदिक तत्त्वांच्या नुसार बघितले तर याचा उपयोग करणे चुकीचे मानले जाते.
शास्त्रांमध्ये देखील या दोन्ही गोष्टींचा पूर्णपणे नि’षेध करण्यात आलेला आहे. नेहमी या पासून दूर राहण्यास सांगितले गेले आहे. आपले भोजन हे आपल्या शरीरावर पूर्णपणे प्रभाव पाडत असते. अन्नाचा शरीराच्या जैविक कार्यावर कसा परिणाम होतो यासंदर्भात, अन्न साधारणपणे आयुर्वेदात तीन प्रकारांमध्ये विभागले गेले आहे – सात्विक, तामसिक आणि राजसी.
या तीन प्रकारचे अन्न खाल्ल्याने शरीरात सत, तम आणि राज गुण प्रसारीत होतात. आयुर्वेदाचे वैज्ञानिक तत्व असे सांगते की योग्य अन्न खाण्यावर भर दिला पाहिजे. शारदीय नवरात्री पावसाच्या नंतर लगेच आणि हिवाळ्यापूर्वीच्या हंगामात पडत असल्याने, हा दोन ऋतू मधील वेळ आहे. आयुर्वेदानुसार, हवामान बदलण्याच्या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
त्यामुळे खोकला आणि सर्दीसारखे सामान्य संक्रमण अनेकदा दिसून येते. अनेक धर्माचे लोक याचे सेवन करणे निषेध मानतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.