घरामध्ये या ठिकाणी कधीही लावू नका पूर्वजांचा फोटो नाहीतर होईल आपल्याला खूप मोठे नुकसान; सर्व देव होतील नाराज.!

अध्यात्म

आपल्याला ज्यांनी घडवले, ज्यांनी आपल्या जन्माला घातले त्यांचे ऋण व उपकार आपल्याला अनंत काळ आयुष्यभर ठेवावे लागतात! आयुष्यात पुढे जात असताना आपण पिढ्यानपिढ्या आपल्या पूर्वजांचे आभार मानत असतो. आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे व कर्मांमुळे आपल्याला आपले आयुष्य लाभलेले असते. तसेच आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही असतो ते आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळेच मिळवत असतो.

आपल्या घरातील कर्ते, थोर पूर्वज जेव्हा मृत्युमुळे आपल्याला सोडुन जातात तेव्हा आपण त्यांची आठवण म्हणून त्यांचे फोटो व तसबिरी फ्रेम करून घरामध्ये लावत असतो. घरामध्ये येता जाता आपल्या पुर्वजांचे आपल्याला दर्शन व्हावे व आपण त्यांच्या महान कार्याचा व आदर्शांचा वारसा पुढील पिढीस द्यावा म्हणून आपण घरामध्ये आपल्या पूर्वजांचे फोटो लावत असतो.

आपण आपल्या घरामध्ये बरेचदा आपल्या पूर्वजांचे फोटो लावत असतो. हे फोटो लावण्यामागचा उद्देश हाच असतो की आपले मयत झालेले पूर्वज आपल्या समोर फोटोतून आपल्याला आशीर्वाद द्यावे व आपल्या घर परिवारावर त्यांची कृपा राहावी म्हणून आपण हे फोटो घरामध्ये लावत असतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरांमध्ये पूर्वजांचे फोटो लावताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते! अन्यथा आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

हे वाचा:   स्त्री असो वा पुरुष असे काम कराल तर घरात लक्ष्मी कधीच टिकणार नाही.!

आपण आपल्या पूर्वजांचे फोटो कधीही देवी-देवतांच्या फोटो सोबत लावू नये. आपल्याला पृथ्वीवर आणलेल्या पूर्वजांना आपण देवस्वरूप मानतो, मात्र देवी-देवतांच्या जागी पाहणे व देवी देवता असणे यातील फरक समजुन घेतला पाहिजे. याकरता देवांसोबत पुर्वजांचे फोटो लावणे हे वास्तुशास्त्रानुसार चुकीचे आहे. देवी-देवतांच्या फोटोंसोबत पूर्वजांचे फोटो लावल्यामुळे घरांमध्ये देवदोष निर्माण होतो. यामुळे देवी-देवता आपल्यावर रुष्ट होतात व आपण केलेल्या व्रतंवैकल्याचे शुभ फळे देवी-देवता आपल्याला देत नाहीत.

वास्तुशास्त्रानुसार आपल्या पूर्वजांचे फोटो कधीही बेडरूम किंवा किचनमध्ये लावू नये. बेडरूम अथवा किचनमध्ये फोटो लावल्यामुळे घरामध्ये भांडणे व कलह वाढतात. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. कौटुंबिक वैमनस्य वाढीस लागते. तसेच कुटुंबामध्ये सुख-समृद्धीची कमतरता निर्माण होऊ लागते. घराच्या मध्यभागी कधीही पूर्वजांचा फोटो लावू नये, कारण यामुळे घरातील व्यक्तींच्या मान- सन्मानाला हानी पोहोचते.

घरातील पूर्वजांचे फोटो कधीही घरातल्या जिवंत व्यक्तीच्या फोटो सोबत लावू नये. असे केल्यामुळे घरातील जिवंत व्यक्तींच्या आयुष्यावर त्याचे नकारात्मक परिणाम होतात. तसेच जिवंत व्यक्तीचे आयुर्मान कमी होते व अकाल मृत्युचे भय वाढते. घरामध्ये पूर्वजांचे फोटो कधीही लटकते किंवा झुलते असलेले असु नये. असे केल्यामुळे त्या व्यक्तीचे जीवन  देखील लटकते व झुलते होते

हे वाचा:   हे रोपटे घरामध्ये लावा एखाद्या चुंबका सारखे पैसे घरात ओढला जाईल; गरीबी कायमची निघून जाईल.!

.वास्तुशास्त्रानुसार घरांमध्ये पूर्वजांचे फोटो नेहमी उत्तर भागामध्ये असलेल्या खोलीमध्ये लावले पाहिजे, जर असे करणे शक्य नसेल तर घरांमध्ये पूर्वजांचे फोटो नेहमी उत्तर दिशेला असलेल्या भिंतीवर लावावे. यामुळे फोटोतील पुर्वजांची दृष्टी नेहमी दक्षिणेकडे असेल ,असे केल्यामुळे घरामधील अकाल मृत्यूचा दोष निघून जातो! तर हे होते वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांच्या फोटो व तसबिरी लावण्यााबाबतचे नियम.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *