कुरळे केस फक्त दोनच दिवसात होतील सरळ, हे पाणी केसांना लाऊन ठेवा.!

आरोग्य

पुरुष असो की महिला सर्वांना आपल्या केसांची काळजी असते. केस हे आपल्या सुंदरते चे प्रतीक आहे. पुरुष असो वा महिला सर्वांना आपले केस सुंदर असावे असे वाटत असते. अनेक लोकांचे केस हे खूपच कुरळे असतात. अशा लोकांना सिल्की केस हवे असतात, परंतु कुरळे केस देखील खूपच सुंदर दिसत असतात. पण अशा लोकांना सिल्की केस खूप आवडत असतात.

परंतु चिंता करण्याची काही गरज नाही. तुमचे जर कुरळे केस असतील तर यावर काही छोटेसे उपाय करून तुम्ही समाधान मिळवू शकता. कुरळ्या केसांची समस्या असल्यास तुमच्यासाठी आम्ही एक छोटासा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने अगदी काही दिवसातच केस सरळ घनदाट होतील. या बरोबरच केसांची वाढ देखील चांगल्या प्रकारे होईल.

केसांना सुंदर बनवण्यासाठी सरळ सिल्की बनवण्यासाठी अनेक महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करत असतात. परंतु त्यामुळे देखील त्यांना याचा जास्त फायदा होऊ शकत नाही. परंतु असे जर होऊ शकले तर कसे होईल जर तुम्ही घरच्या घरीच केसांना सुंदर बनवू शकला. तर यासाठी तांदळाचा हा छोटासा उपाय केल्यास केस खूपच सुंदर व नैसर्गिक रित्या सिल्की बंद केले जातील.

हे वाचा:   तुम्ही कधी विचारही करू शकणार नाही, एक अंड तुमच्या केसांचे काय हाल करू शकतात.! केसांची सुंदरता हवी असलेल्या लोकांनी एकदा नक्की वाचा.!

यासाठी आपल्याला एक छोटासा पॅक बनवायचा आहे. हा पॅक बनवण्यासाठी आपल्याला काही साहित्याची आवश्यकता भासेल. हे साहित्य कोण कोणते आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया. आपल्याला यासाठी एक ते दोन वाटी तांदूळ लागणार आहे. यासाठी आपल्याला आणखी एक पदार्थ लागेल तो म्हणजे तेल. हा उपाय करण्यासाठी नारळाचे तेल उत्तम असेल.

यासाठी आपल्याला दोन चमचे मुलतानी माती देखील लागणार आहे. मुलतानी माती ही केसांसाठी खूपच फायदेशीर ठरली जाते. आपल्याला यासाठी अर्धा चमचा एलोवेरा जेल आणि अर्धा चमचा ग्लिसरीन लागेल. यासाठी तांदूळ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ते गाळून एका भांड्यात पाणी काढा. लोखंडी कढईत तांदळाचे पाणी शिजवून घ्या. पाणी घट्ट आणि मलईदार झाल्यावर गॅस बंद करा.

हे वाचा:   हे असे पाणी तुमचे अवघे जीवनच बदलून टाकेल.! पित्त, कफ, जळजळ पूर्णपणे शांत होते.! कुठल्याही गोळीची गरज पडणार नाही.!

तांदळाची मलई थोडीशी थंड होऊ द्या. त्यात खोबरेल तेल, २ चमचे मुलतानी माती, ग्लिसरीन, कोरफड जेल घाला. तुम्हाला हवे असल्यास नारळाच्या तेलाऐवजी तुम्ही ऑलिव्ह किंवा इतर कोणतेही तेलही घेऊ शकता. केस चांगले विलग करा. यानंतर, पॅक टाळूमध्ये चांगले लावा. मेंदीप्रमाणे हळू हळू लावा.
यानंतर हाताने केस सरळ करा. या दरम्यान केसांना वळवू नका.

यानंतर तुम्ही केस झाकून ठेवू शकता. एका तासासाठी पॅक केसांना लावून ठेवा. नंतर आपल्या सौम्य शैम्पूने केस धुवा आणि नैसर्गिकरित्या कोरडे करा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *