मधुमेह म्हणजे डायबेटीसच्या रुग्णांची संख्या आपल्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका रिसर्च मध्ये निदर्शनास आले आहे त्यावरून भारत ही डायबेटीसची राजधानी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तेंव्हा आपण काळजी घेतली पाहिजे. व्यायामाचा अभाव, बदलती जीवनशैली,फास्ट फूड -जंक फूड खाणे, अनुवांशिकता, ताणतणाव इत्यादी विविध कारणांमुळे मधुमेह आपल्याला होतो.
शरीरातील संपूर्ण ऊर्जा नष्ट होते. हाडे ठिसूळ बनतात. हृदय, किडनी, डोळे, इत्यादी अनेक शरीराच्या भागांवरती हा मधुमेह दुष्परिणाम करतो. योग्य काळजी घेतल्यास मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. मधुमेह नियंत्रणात न राहिल्यास वारंवार हॉस्पिटलचा वाढता खर्च आणि चकरा ही वाढतात. इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. अनेक आयुर्वेदिक उपचार यावर उपलब्ध आहेत.
तुम्हाला घाबरवायचं हेतू नाही परंतु भविष्यात होणाऱ्या धोक्यापासून आधीच सूचना देऊन जाग करणे आमचं काम आहे. आज आम्ही तुम्हाला मधुमेह कितीही असला तरी ही नियंत्रणात कसा ठेवायचा याविषयी सांगणार आहोत. कारण मधुमेह हा दुर्लक्ष करण्यासारखा रोग नाही याची वेळीच काळजी घेतल्यास पुढे होणाऱ्या त्रासापासून तुम्ही वाचू शकता. हा उपाय तुम्ही फक्त सलग सात दिवस केले असता तुम्हाला फरक लगेच जाणवेल.
त्यासाठी तुम्ही तुमचे रक्त आधी तपासून ठेवा. जेणे करून किती फरक झाला आहे हे तुम्हाला समजेल. आवळा पावडर : आवळ्यामधील घटकांमुळे शरीरातील कार्बोहायड्रेटचे लवकर पचन होते आणि त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. भरपूर प्रमाणात विटामिन सी असल्यामुळे हाडं मजबूत राहतात. भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे रक्तातील फ्री रॅडिकल नष्ट करण्याचे काम ते करतात. आपल्या शरीरातील इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवते. बहुगुणी आवळा पावडर तुम्ही सहा चमचे घ्या.
मेथी दाणे पावडर : मेथीचे दाणे बाजारातून आणून तुम्ही घरी पावडर बनवा. यामधे सोल्युबल फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात असणारे अमिनो ऍसिड आपल्या शरीरातील रक्तामधील साखर संपवायचे काम करते. यामुळे रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहते. तीन चमचे मेथीच्या दाण्याची पावडर घ्या.
कारल्याच्या बियांचे चूर्ण : मधुमेहचे रोगी सर्रास इन्शुलिन तयार करण्यामध्ये कमी पडतात किंवा ते तयारच करू शकत नाहीत. कारल्या मध्ये इन्शुलिन प्रमाणेच तत्व असतात. म्हणूनच शास्त्रामध्ये कारल्याचा इन्सुलिन प्लांट या नावाने उल्लेख आढळतो. दोन चमचे कारल्याचे बियांचे चूर्ण घ्या.
वरील सर्व मिश्रण एका वाटीमध्ये एकजीव करून घ्या. ते झाले आपले डायबिटीस वरील रामबाण उपाय तयार. हे चूर्ण तुम्ही रोज सकाळी अनुशापोटी एक चमचा कोमट पाण्यात टाकून प्यायचे आहे. एक तास नंतर काहीही खाऊ किंवा पिऊ नये. फक्त सातच दिवसात तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल.
टीप : अजून इफेक्टिव परिणामांसाठी सुमारे 40 मिनिटे चालणे तेव्हा जमेल तो सोपा व्यायाम तुम्ही करावा. उपायामध्ये सातत्य ठेवा.
आपल्या आरोग्याची काळजी घ्या. उपाय आवडल्यास तुम्ही स्वतः नक्की करून पहा आणि गरजू व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.