हिला सर्वजण म्हणातात वेडी बाभूळ, पण खरेतर आहे ही शाहनी बाभूळ.! हिचे असंख्य फायदे एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक अशा झाडा बद्दल माहिती सांगणार आहोत ज्याला विलायती बाभूळ असे म्हणतात. बाभळीच्या झाडाप्रमाणे च या झाडाचे स्वरूप असते. ‘बोया पेड़ बबूल का, आम कहां से खाय’..संत कबीर यांच्या या उक्तीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. याला जंगली कीकर, सुबाभूळ असे कितीतरी नावे आहेत. या विलायती बाभळीची उंची सु. 8 मी. असून तिची मुळे खोलवर पसर लेली असतात.

मुळांवर छोट्या गाठी तयार होतात, त्यांत नायट्रोजनाचे स्थिरीकरण करणारे सूक्ष्मजंतू असतात. ह्या वनस्पतीची वाढ फार वेगाने होते. खोडावरची साल डार्क तपकिरी व पातळ असून पाने दोनदा विभागलेली, संयुक्त, पिसासारखी व 10– 18 सेंमी लांब असतात. पानांच्या व दलांच्या मध्यशिरेवर शेवटी बारीक मऊ काटा असतो.

मूळचे उष्णकटिबंधीय अमेरिकेतील व पॅसिफिक बेटांतील हे झाड असून भारतातही उष्ण भागात जसे की राजस्थान, येथे जास्त आढळून येतात. इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनी, मलेशिया आणि आग्नेय आशियातील इतर देश व आफ्रिका या ठिकाणी त्याची लागवड मोठ्या प्रमाणात आढळते. याची फुले पिवळसर पांढरी, द्विलिंगी, पंचभागी व बिनदेठाची असतात आणि ती जुलै–ऑक्टोबर मध्ये येतात.

हे वाचा:   इम्युनिटी इतकी वाढेल की कोणताच आजार तुम्हाला हात सुद्धा लावू शकणार नाही.!

याला तुळशीप्रमाणे च मंजिरा ही असतात. कमी मेहनतीत ही झाडे छान उगवतात. अनेक कारणांनी जंगलनाश झाला असेल तर तेथे परत जंगलाची किंवा सुयोग्य गवताळ प्रदेशाची निर्मिती करण्यास आवश्यक ती जमिनीची परिस्थिती घडवून आणण्यास या झाडाची लागवड करणे उपयुक्त असते. जमिनीची धूप थांबविण्यासाठी जंगलातील मोकळ्या जागेत हे झाड लावतात.

या झाडाची पाने, फांद्या व बियांची पूड खताकरिता वापरतात. गुरे, शेळ्या व मेंढ्या हिचा पाला, शेंगा तर कोंबडयांनाही पाला पूरक अन्न म्हणून देतात. या झाडाच्या सालीत सुमारे 16.5% टॅनीन असत. शरीरातील वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग करतात. याचे साल कृमिनाशक आहे.

बाभळीच्या शेंगा घेऊन त्या उन्हामध्ये वाळत घालाव्या याची पावडर बनवावी व रोज सकाळी एक चमचा थोड्या कोमट पाण्यात बरोबर घ्यावा. असे केल्याने गुडघेदुखीचा त्रास नष्ट होत असतो. ज्या लोकांना कंबर दुखी पाठ दुखी तसेच इतर शारीरिक दुखणे असेल तर अशा लोकांनी देखील याचा अशा प्रकारे वापर करावा. यामुळे भरपूर असा फायदा आपल्याला होत असतो.

हे वाचा:   घरात मच्छर खूपच वाढले आहेत का.? हे एक काम तुमचे खूप मोठे टेन्शन कमी करणार.! प्रत्येकाने घरात करावे हे एक काम.!

सुबाभळीचे लाकूड कठीण, मजबूत व घट्ट असते ते घरबांधणीत, जळणास व कोळसा बनविण्यास चांगले असते. बियांतील डिंक (सुमारे 25%) सौंदर्यप्रसाधने व काही अन्नपदार्थ बनविण्याच्या उद्योगांत फायदेशीर ठरला आहे. बिया, शेंगा व साल यांपासून काढलेल्या विविध रंगांचा उपयोग कापडं मिल मध्ये करतात. कागद निर्मितीत लगद्याकरिता याच्या लाकडाचा उपयोग होतो.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *