नमस्कार मित्रांनो, रात्री झोपताना मोबाईल वापरणाऱ्यांनी ही माहिती नक्की वाचा. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा जर तुम्ही जास्त मोबाईलचा वापर करत असाल तर तुमचे डोळे दुखतात? मोबाईलच्या अतिवापराने तुम्हाला चक्कर आल्यासारखे होते का?किंवा जेव्हा पण तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुमच्या छातीत दुखते? तुमचं डोकं दुखतंय का? यापैकी काहीही लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
अन्न, वस्त्र, निवारा सोबतच आधुनिक काळाबरोबर मोबाईल ही एक मूलभूत गरज बनली आहे. चरस अफू गांजा यांसारख्या व्यसनाधीन लोकांना जेल मध्ये टाकले जात परंतु अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ही मोबाईलच्या व्यसनांमध्ये बुडाली आहे. याकडे कोणाचेच लक्ष नाही. याउलट रात्री मोबाईलचा वापर केल्याशिवाय किती तरी लोकांना झोपही येत नाही. तुम्हीपण त्यापैकीच एक आहात का?
तुम्ही पाहिलं असेल तर आपले शरीर सर्व काम हे मेंदूमध्ये फिक्स असलेल्या प्रोग्राम टाइमिंग च्या हिशोबाने करते. एका विशिष्ट वेळी आपण उठतो, जेवतो थोडेफार इकडेतिकडे होऊ शकते. जेव्हा आपण कोणतेही काम नियमितपणे करत असतो तेव्हा मेंदू त्याची दखल घेऊन त्याच वेळी तसं वागू लागतो. त्यालाच cardiac rhythm म्हणतात. जर आपले शरीर बाहेरच्या वातावरणाच्या अनुसार चालले तर Rhythm संतुलित राहतो. असं नाही झालं तर आपल्या शरीर अस्वस्थ होते.
आपल्या मेंदूमध्ये असे काही न्युरोन असतात ते आपल्या शरीरातील क्लॉक मेंटेन करायला मदत करतात. सूर्यास्त झाला असता Melatonin हार्मोन शरीरांत रिलीज होते. जे आपल्या झोपेसाठी आवश्यक आहे. न्यूरॉन हे निळ्या रंगा प्रति मेंदूला असा सिग्नल देतात की अजून दिवस आहे आणि आपल्याला जागायचे आहे. म्हणून तर निळ्या आकाशाला बघून आपण जागे असतो. खूप कमी झोप आपल्याला अशा वेळेस येते.
पण जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, मोबाईल वापरतो त्यातून निळ्या रंगाचे किरण बाहेर पडतात. अर्थातच जर तुम्ही रात्रीच्या वेळी लॅपटॉप कम्प्युटर मोबाईल सतत बघत राहाल तर त्यातून निघणारी निळ्या रंगाची किरणे तुमच्या डोळ्यावर पडतील आणि तुमच्या मेंदूपर्यंत असा संदेश दिला जाईल की आता दिवस आहे. असं झाल्यामुळे शरीरातील Melatonin Harmone रीलिज होणे बंद होते.
परिणामी आपल्या झोपेवर इफेक्ट होतो. बऱ्याच जणांचा मोबाइलला निळ्या रंगाचे फिल्टर लावले असते काही प्रमाणात त्याचा त्रास कमी होईल परंतु तुमच्या डोळ्यांवर यांचा प्रभाव नक्कीच पडेल. आणि तुमच्या शरीरात dopamine hormone (तात्पुरता आनंद देणारे ) तयार होईल. तो आनंद टिकवण्यासाठी तुम्ही युट्युब, फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम इत्यादी साइटवर तुम्ही अजून अजून स्क्रोल करत राहाल. आणि रात्र कधी झाली त्याचे तुम्हाला भान ही नसेल.
झोप माणसाची सर्वात मोठी गरज आहे. सलग खूप दिवस जर तुम्ही झोपला नाही तर तुमचा मृत्यू निश्चित आहे. पुरेशी झोप झाल्यानंतर सर्व थकवा जाऊन दुसर्या दिवशी काम करण्यासाठी नवीन ऊर्जा तुम्हाला मिळते. ऑस्ट्रेलियामधील एका रिसर्च नुसार, लोकांचा IQ लेव्हल कमी झाला आहे. लोकांमधील धैर्याची पातळी कमी झाली आहे. कॉन्सन्ट्रेशन क्षमता कमी झाली आहे. हे सर्व मोबाईलचा अतिवापराचे दुष्परिणाम आहेत.
सहज सोप उपलब्ध होणाऱ्या मोबाईल मुळे आपलं जीवन आपण आपल्या हाताने धोक्यात टाकत आहोत. लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या तुलनेमध्ये मोबाईलचा अती वापर करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यानी ब्रेन ट्यूमर, कॅन्सर सारखे भयानक रोग होण्याची शक्यता असते. मोबाईल वापरा पण मर्यादित…! तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.