आता उन्हाळ्याचा ऋतू असल्यामुळे आपल्यापैकी अनेक जण कलिंगड खात असतात. कलिंगड आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असते. पण आपल्यापैकी अनेक जणांना यातील गुणधर्म माहीत नसतात. कलींगड खाल्ल्याने आपल्या शरीराला आतून थंड वाटते म्हणूनच आपण प्रत्येक उन्हाळ्यात कलिंगडाचे आपण सेवन करत असतो. पण कलिंगड आपल्या शरीरासाठी कशा प्रकारे उपयुक्त ठरते, हे आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नसते.
अनेक जणांच्या अंगातील हिट म्हणजेच उष्णता कामी करण्याचे काम देखील कलिंगड करते. या उष्णता मुळे आपले केस, पांढरे व्हायला लागतात त्याचप्रमाणे आपल्याला कफ, असिडिटी यासारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आपण कलिंगड खाण्याचे पाच असे फायदे जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या शरीरातील सर्व समस्या दूर होतील.
कलिंगडला एक सुपर फूड म्हणून देखील ओळखले जाते. कारण हे खाल्ल्यामुळे पोट साफ रहाणे, थंडावा मिळणे अनेक प्रकारचे काम कलिंगड करते. त्याच प्रमाणे कलिंगड मध्ये 92% पाणी असते. त्यामुळे शरीर हायड्रेट राहायला मदत होते. आणि त्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासत नाही. सर्वात पहिला फायदा म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये र’क्ताची कमतरता असेल तर ती भरून येण्यास मदत होते.
यामध्ये विटामिन सी आणि आयरन असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढ होते. आणि र’क्त वाढण्यास मदत होते. कलिंगड मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ऍसिडिटी किंवा होत नाही. जर पोटात गॅस असेल तर तो देखील नाहीसा होतो. कलिंगड मध्ये पोट्याशियम चे प्रमाण जास्त असल्याने आपल्याला हाडांचा त्रास होत नाही. विटामिन ए असल्यामुळे डोळ्यांचे त्रास होत नाहीत.
जसे की डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांची जळजळ होणे, कमी दिसणे. हे सर्व त्रास कलिंगड चे सेवन केल्याने दूर होण्यास मदत होते. कलिंगड खाल्ल्याने हृ’दय वि’काराचा त्रास देखील होत नाही. कलिंगड मध्ये लायकोपीन असल्याने चेहराचे सर्व त्रास म्हणजेच त्वचेचे आजार होत नाही. जसे की चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, पिंपल्स येणे किंवा डाग येणे. अशा प्रकारचे सर्व आजार देखील दूर होतात.
रोजच्या खाण्यामध्ये कलिंगड चा वापर केल्यास आपली त्वचा चमकदार बनते. पण त्याच बरोबर ज्यांना मधुमेह असेल त्यांनी कलिंगडचा वापर करू नये. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात साखरेचे प्रमाण असते. त्याच बरोबर सकाळी उपाशी पोटी कलिंगड खाल्ल्यानं याचे अधिक परिणाम दिसून येतात. कलिंगडचे सेवन आपण कलिंगड कापून त्यावर काळे मीठ टाकून देखील करू शकतो.
किंवा ज्यूस बनवून देखील करू शकतो. थोडक्यात कलिंगड खाल्ल्याने पोटाचे आजार त्वचेचे आजार अशा प्रकारचे सर्व आजार दूर होतात आणि आपले शरीर निरोगी राहायला मदत होते. जर तुम्हाला देखील तुमच्या शरीरातील उष्णता कमी करायची असेल अन् या उन्हाळा मद्ये शरीरातील सर्व समस्या करण्यासाठी कलिंगड तसेच अन्य फळांचा अवश्य समावेश करा.
ज्या फळात पणायचे प्रमाण जास्त असे फळ खाल्याने आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल यामुळे तुम्हाला अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे यासारखे सगळ्या समस्या दूर होतील. जर तुम्हाला कलिंगड खाणे आवडत नसेल तर अशावेळी तुम्ही कलिंगडाचा ज्यूस बनवणे किंवा बाजारामध्ये उपलब्ध असणारे आईसक्रीम कॅंडी देखील सेवन करू शकता.
हल्ली कलिंगड साखर हंगाम असल्याने या हंगामात हे फळ खाणे रामबाण औषध ठरते कारण की जर आपण योग्य त्या हंगामामध्ये योग्य फळ खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक ती तत्व देखील प्राप्त होतात परिणामी आपले शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.