मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुळशीच्या झाडाची कशी काळजी घ्यावी. काय कारणामुळे आपलं तुळशीचे रोपं सुकतात किंवा कोमेजतात. पूजा केल्यानंतर तांब्या मधले पूर्ण पाणी आपण तुळशी ला घालतो. म्हणजेच सांगायचा हेतू हा की अति पाणी दिल्यामुळे आपले तुळशीचे रोप खराब होते. रोपाची मूळ खराब होतात. तुळशीला येणाऱ्या मंजिरी वेळच्या वेळी कापल्या पाहिजेत.
त्या मंजिरी तुम्ही पुन्हा माझे टाकून नवीन तुळशीचे रोप उगवू शकता किंवा घरातील चहा पत्ती मध्ये, काढ्या मध्ये असा त्याचा औषधी वापर ही करू शकता. सांगायचा हेतू हा की वेळोवेळी तुळशीच्या मंजीरा न कापल्यामुळे रोपाची जास्त शक्ती बिया बनवण्यात खर्ची पडून पान पिवळी पडतात, रोप सुकते व वाढ खुंटते. परिणामी तुळशीचे रोप लवकर खराब होते. म्हणूनच तुळशीच्या मंजेरी बिया वेळेत काढणे गरजेचे असते.
तुळशीचे रोप प्रत्येक अंगणात असलेच पाहिजे. घरात सकारात्मकते सोबत आजूबाजूचे वातावरण हवा फक्त ठेवण्याचे काम तुळस करते. त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटते. तुळसचे झाड कटिंग ने ही लागते. त्यामुळे बिया नसतील तरी तुम्ही तो स्वरूप लावू शकता. त्यालाही मंजिरी उगवल्यावर ती पुन्हा तुळशीचे अनेक रोपे तयार करू शकता. तुळशीचे पान म्हणजे खोड मूळ हा प्रत्येक भाग आयुर्वेदिक औषध आहे.
चांगल्या तुळशीचा रोपासाठी नेहमी सेंद्रिय खतांचा वापर करावा. रासायनिक खते वापरू नयेत. पाणी जास्त देऊ नये. खासकरून थंडीच्या दिवसांमध्ये तुळशीच्या रोपाची जास्त काळजी घ्यावी लागते. थंडीमध्ये तुळशीचे रोप लवकर सुकते. आवश्यक पुरेशा प्रमाणामध्ये सूर्यकिरणे तुळशीच्या रोपाला योग्य वाढीसाठी मिळाली पाहिजेत. त्यामुळे रोप लावण्यासाठी अशीच जागा निवडावी.
टीप : जस मंजिरी वेळेत कपावी त्याच प्रमाणे सुकलेली पाने फांदया छाटणे आवश्यक आहे. असं न केल्यास बाकी पान वेगाने सुकू लागतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.