स्वयंपाक घरात कोणत्याही फोडणीमध्ये कडीपत्ता चा वापर केल्यास फोडणी चविष्ट बनते. पण आज आम्ही तुम्हाला कडीपत्ता चे तेल कसे बनवायचे त्या बद्दल सांगणार आहोत. त्याआधी कढीपत्ता चे फायदे आपल्याला माहीत हवेत. आपल्या केसांना कढीपत्ता कसा फायदेशीर आहे त्याबद्दल ते आपण पाहूया.
सूर्याच्या तीव्र किरणांमुळे आणि प्रदूषणामुळे केसांमध्ये आणि स्कॅल्प मध्ये समस्या निर्माण होतात. त्यापासून बचाव करण्यासाठी कडीपत्त्याचे असलेले एंटीऑक्सीडेंट अत्यंत फायदेशीर असतात. कडीपत्ता मध्ये अमिनो ऍसिड आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतात. दोन्ही गोष्टी गळत्या आणि पातळ केसांवरती अनमोल उपाय आहेत.
कढीपत्ता मध्ये असे काही गुण असतात जे अनेक चेहऱ्यावर लावायचा मलमांमध्ये वापर करतात. त्यामुळे तुमची त्वचा तजेलदार व सतेज दिसू लागते. अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचेवर येणारी खाज आणि फंगस यापासून बचाव होतो. कोंडा होणे यावर कडीपत्त्याचे तेल हे संजीवनी आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणाचे काम कढीपत्ता करते.
कडीपत्ता बुद्धी तल्लख बनवते आणि विचार करण्याची क्षमता वाढते. कढीपत्ता चे तेल कसे बनवावे? एक कप कढीपत्ता घ्या ( पान वेगळी करून स्वच्छ धुऊन फडक्याने पुसून वाळवावेत / उन्हात कडीपत्ता सुकवू नये.) मिक्सरवर बारीक करून घ्या. त्यात 4 चमचे खोबरेल तेल घाला. पेस्ट बनवा. पाणी घालू नये. सपाट जाड बुड असलेले भांडे घ्या. त्यात तीन कप खोबरेल तेल घाला.
यात आपण तयार केलेली पेस्ट घाला. मिश्रण एकजीव करा. आता गॅस चालू करा. मंद आचेवर हे मिश्रण 15 मिनिटे उकळा. दरम्यान सतत हलवत रहा. तासभर थंड करा. तेल वस्त्रगाळ करून बाटलीत भरून घ्या. आपले तेल तयार!! राहिलेला चोथा मध्ये दही घालून ती पेस्ट केसांना लावा.
15मिनिट ठेवा. केसं धुवा.. किंवा मुलतानी मातीत पाणी घालून ही पेस्ट हात, पाय कुठे ही लावू शकता. हे तेल लावावे कसे? हे तेल लावताना त्यात दोन व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल घाला आणि हलक्या हाताने केसांवर दोन तासासाठी मालिश करून ठेवा. नंतर कोणत्याही सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवा.असं आठवड्यात 2-3 वेळेस करा.
सलग तीन महिन्यानंतर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट दिसू लागेल. टीप : तेल बनवताना ते जाळू नये. या तेलाला सुंदर हिरवा रंग येतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.