एका आठवड्यात दोन ते तीन किलो वजन कमी होऊ शकते फक्त आपला डाइट प्लान असा असायला हवा.! वजन कमी करणे खूप सोपे असते.!

आरोग्य

मित्रांनो वाढते वजन म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायामाला फारसे महत्त्व दिले जात नाही. जिम सगळ्यांना परवडणारी नसते. वजन कमी करण्या मध्ये 70% आहार आणि 30% व्यायाम असे प्रमाण असते. यावरून तुम्हाला अंदाज येईलच वजन कमी करण्यामध्ये आहाराला किती महत्त्व आहे. आपला आहार पोषक असला पाहिजे.

जर तुम्ही तुमचे वजन एका दिवसांमध्येच झपाट्याने कमी करू इच्छिता तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला आज अशा काही रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे वजन नक्कीच कमी होईल. रेसिपी मध्ये वापरले जाणारे घटक हे तुम्हाला सहज उपलब्ध होतील. या कृती कमी कॅलरीज असण्यासोबतच अत्यंत चविष्ट देखील आहेत.

त्यामुळे तुमचे कोणतेही उपास मार किंवा जिभेची चव जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. डाएट सुरू करण्याच्या एक रात्र आधी 9pm वाजता एक पेय बनवायचे आहे. त्याची कृती पुढीलप्रमाणे :
दोन ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरा, एक चमचा बडीशेप आणि एक चमचा ओवा घालून हे गरम पाण्यात उकळावे. तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. पोट साफ व्हायला मदत होईल.

हे रात्रीच पेय डाएट सुरू करण्याच्या आधी तुम्ही घ्यावे. सकाळी 6:30 वाजता 5-6 कढीपत्ता पान हळू हळू चावून खावा व नंतर दोन ग्लास पाणी प्यावे. यामुळे पोटातील पचन क्रिया सुधारते. मेटाबॉलिझम रेट वाढतो. यामुळे आपले वजन लवकर घटण्यास मदत होते. त्याचा अजून एक फायदा म्हणजे आपल्या केसांसाठी होय.

हे वाचा:   कधी अचानक दुखायला लागले गुडघे तर पटकन करावा हा व्यायाम.! सलग आठ दिवस हा व्यायाम केल्यास मिळतो भरपूर आराम.!

सकाळी 7-7:30 वाजता रोज सकाळी अर्धा तास कोणताही एक व्यायाम करावा चालणे, सूर्यनमस्कार.. कोणताही एक..प्राणायाम करा. घरातच हातपाय हलवून कोणता ही व्यायाम तुमम्ही नक्की करा. शरीराची हालचाल होणे आवश्यक असते. 8-8:30 वाजता न्याहरी करावी. कमी कॅलरी वाला ओट्स चिला बनवण्याची कृती पुढीलप्रमाणे :

अर्धी वाटी ओट्स अर्धा वाटी पाण्यामध्ये भिजत घालावेत. याची मिक्सरवर पेस्ट बनवा. यात लसूण आलं पेस्ट सोबत कांदा, गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, कोथांबीर बारीक कापून घाला. जिरा पावडर, हळद आणि कमी मीठ. पॅन गरम करून एक चमचा तेल घालून मिश्रण पॅनवर घाला. दोन मिनिटात ओट्स चिला तयार.

11 वाजता हळद आलं पेय बनवा. कृती पुढीलप्रमाणे :
पॅन मध्ये ग्लास पाणी, हळद, आलं आणि काळी मिरी उकळत ठेवा. उकळल्यानंतर हे पेय तुम्ही गाळून प्या. दुपारी जेणाआधी अर्धा तास एक लिटर पाण्यात लिंबू आणि पुदिना घालून तयार केलेले पाणी.. असे दोन ग्लास पाणी प्यावे.

दुपारच्या जेवणात काय खावे? कृती पुढीलप्रमाणे :
100 gm सोया चंक्स घेऊन दोन मिनिटे उकळावे. गाळून एक नॉनसस्टिक पॅन मध्ये ड्राय रोस्ट करून घ्या. 50gm सोया चंक्स घ्या. त्यात दही, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ आणि धणेपावडर घाला.

नॉनस्टिक पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घाला. त्यात दोन विलायची, तमालपत्र, दालचिनी आणि जिरं, काळी मिरी, कांदा घालून फोडणी करा. त्यात आता सोया चंक्स चे बनवलेले मिश्रण घालून भाजी हलवा. तुमची भाजी तयार..चावीसाठी तुम्ही गरम मसाला घालू शकता. एक चपाती, सॅलड, दही आणि सोबत ही भाजी हे तुमचे दुपारचे चवदार जेवण..

हे वाचा:   हातपाय दुखणे, कंबरदुखी, सांधेदुखी असेल तर हे तेल आजच घरी बनवा.! याचे असे फायदे तुम्हाला हैराण करून सोडतील.!

2:30 वाजता पुन्हा आपण बनवलेले पाणी दोन ग्लास प्या. 4 वाजता पुन्हा आलं हळद पेय प्या. रात्रीचे जेवणात काय असावे? कृती : 50gm सोया चंक्स मिक्सरवर बारीक करून घ्या. त्यात हिरवी मिरची, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट घाला. हळद मीठ जिरा पावडर चॅट मसाला घालून मिश्रण एकजीव करा. त्यात एक चमचा बेसन घाला. टिक्की प्रमाणे बनवा.

फ्रिज मध्ये 15 मिनिट ठेवून कमी तेलात नॉनस्टिक पॅन वर हे टिक्की शिजवा. हे कमी कॅलरी असलेले तुमचे रात्रीचे जेवण तयार. याप्रमाणे तुमची दिनचर्या आखा. तुमचे वजन हेल्थी रित्या झटपट कमी होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *