आजपासून तांबे, पितळाची भांडी या घरातील पेस्ट ने घासणे सुरू करा, चमक बघून तुम्हीच थक्क व्हाल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, पाहिलं असेल तांब्या-पितळ्याच्या भांड्यांवर वेळेनुसार काळी वर्तुळे जमा होतात. नेहमीच्या डिटर्जंट पावडरनी त्यांना साफ करणे खूप अवघड असते. बरेच लोक मार्केटमध्ये उपलब्ध असणारे वेगवेगळ्या ब्रँडचे पावडर उत्पादन वापरतात. पण जर तशा प्रकारची पॅस तुम्हाला घरी बनवता आली तर? हे बनवणे अति सोपे आणि कमी खर्चात आहे.

आज आपण पाहणार आहोत तांब्या-पितळेची भांडी साफ करण्यासाठी ची पेस्ट कशी बनवायची? ही पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी गव्हाचे पीठ लागणार आहे. त्यात अर्धी वाटी मीठ घालावे. अर्धी वाटी डिटर्जंट पावडर घ्या, कोणतेही जे तुम्ही घरात कपडे धुण्यासाठी वापरता. हे सर्व एकत्र मिक्स करावे. यात पाव वाटी लिंबाचा रस घालून मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्यावे.

यात पाऊण कप व्हिनेगर घाला. व्हिनेगर घातल्यावर त्यामध्ये रिएक्शन व्हायला सुरुवात होईल. एक चमचा खाण्याचा सोडा घालावा. मिश्रण सतत ढवळत राहावे. सांगितलेले जिन्नस आहे त्या त्या क्रमानेच घालावेत. तुम्हाला हवा असल्यास त्यात तुम्ही एक चिमुटभर लाल रंग फुड कलर घालायचा आहे. रंग घालने ऐछिक आहे. पण रंग टाकल्यावर याचा रंग खूप सुंदर दिसतो.

हे वाचा:   उपवासाला बनवा हा नाश्ता.! पोट एकदम गच्च भरून जाईल.! नवरात्री स्पेशल उपवासाच्या साधा सोपा नाष्टा प्रकार.!

मिश्रण मिक्स करण्यासाठी आपण आयात अर्धा वाटी कोमट पाणी घालणार आहोत. मिश्रण खुप घट्ट वाटत असेल तर थोडे थोडे करून पाणी घालून मिश्रण हलवत राहावे. हे मिश्रण तुम्ही एका बाटलीत भरून ठेवू शकता. आपणही पेस्ट द्रव तुपात बनवत असल्यामुळे पाणी घातले आहे जर हे तुम्हाला पावडर स्वरूपात हवे असेल तर, वरील कृती मध्ये पाणी न घालता मिश्रण उन्हात वाळवावे. आणि पावडर रूपात तुम्ही साठवू शकता.

तांब्या किंवा पितळाचे कोणतेही ऑक्सीडाईज झालेले भांडे घ्या ज्यावर काळ्या रंगाचा थर साठला असेल तर ते खराब असेल. त्या भांड्यावर आपण बनवलेली पेस्ट पूर्णपणे लावून घेऊन दोन मिनिटासाठी तसेच ठेवा. दोन मिनिटांनी तुम्हाला भांडे पूर्णपणे साफ झालेले दिसेल. थोडेसे घाण आहे असे वाटल्यास त्या ठिकाणी पेस्ट लावून पुन्हा हातानी घासावे.

हे वाचा:   एक पोळपाट बेलने तुमचे लाखो रुपये वाचवू शकते.! हाता-पायांना येणाऱ्या मुंग्या अगदी दोन मिनिटात राहतील.! सांधेदुखी, टाच दुखी साठी अगदी गावरान उपाय.!

तुम्हाला लगेच फरक जाणवेल. पाण्यानी स्वच्छ धुवा. ही भांडी नव्या नवलाई प्रमाणे चमकतील. नियमित स्वच्छ ठेवल्यास एकदम खूप घासावे लागणार नाही. आणि कमी मेहनतीत लवकर साफ होतील. आजची ही अनोखी माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा तुम्ही तुमच्या घरातील तांब्या-पितळेची भांडी आता चमकवून टाका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *