भात की चपाती.! भात आणि चपाती खाण्याचा हा नियम माहिती आहे का.? कधी काय खावे हे नक्की जाणून घ्या.!

आरोग्य

मित्रांनो माणूस मेहनत करतो. अतोनात कष्ट करतो सकाळी उठून कमाला जातो फक्त दोन वेळच्या जेवणासाठी. अन्न हे मानवाची मूलभूत गरज आहे. आपल्याला जगण्यासाठी अन्नाची फार गरज आहे. अन्नात असणारे पोषक तत्व आपल्याला ताकद देतात ऊर्जा देतात ज्याने तुम्हाला काम करण्यासाठी उमंग व उत्साह मिळतो. आपल्या शरीराला रोज अनेक जीवनसत्व तसेच कर्बोदके व प्रथीने यांची गरज भासते.

आपण जे अन्न ग्रहण करतो त्यातून ही सर्व जीवनसत्वे मिळतात का हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे. प्रत्येक प्रदेशात त्याच्या आस पास च्या वातावरणाच्या अनुसार आहार ठरवला जातो. आपल्या भारतीय घरांमध्ये आपल्या वातावरणाच्या स्वरूपाने मुख्यतः भात व चपात्या अनेक वर्षां पासून बनवल्या जातात. हे दोन्ही पदार्थ आपल्या वातावरणासाठी अत्यंत योग्य आहेत व याने आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते.

मित्रांनो आज आपण या लेखाद्वारे आपल्या शरीरासाठी भात खाणे जास्त फायदेशीर आहे की चपाती हे जाणून घेणार आहोत. हे दोन्ही पदार्थ भारतात मोठ्या प्रमाणात पिकवले जातात. भात खरीप तर गहू रब्बी या मोसमात येतात. हे दोन्ही घटक आपल्या भारतीय जेवणाचा एक अविभाज्य भाग आहेत आणि आपल्या या वातावरणात पचण्यास देखील हलके आहेत. मित्रांनो चपाती खाण्यास अत्यंत फायदेशीर व त्यात असणारे फायबर अन्न पचन करण्याची क्रिया योग्य वेळी करते.

सोबतच वजन वाढले असल्यास अथवा शरिरावरील चरबी कमी करण्यासाठी देखील तुम्ही चपातीचे सेवन करु शकता. सोबतच भात हा पचण्यास थोडा जड आहे. या मध्ये मोठ्या प्रमाणात कर्बोदके असतात वजन आणि यामुळे वजन वाढवण्यासाठी फार मोठी मदत होते. मित्रांनो आपण रोज भात ग्रहण करतो. मात्र हा भात तुम्हाला योग्य मिनरल्स देतोय अथवा नाही हे देखील तुम्ही जाणून घेतले पाहिजे. भात हा तांदळापासून बनवला जातो तेव्हा तांदळाचे बाहेरील आवरण काढून टाकले जाते.

हे वाचा:   प्रत्येक पत्नी हे तीन राज आपल्या पतीपासून नेहमी लपवून ठेवतात, यामागचे कारणही खूप वेगळे असते.!

त्यावेळी अनेक अँटी ओक्सिडेंट आपण गमवून बसतो. तसेच बाजारात मिळणार सफेद तांदूळ आपण रोज खातो. हा सफेद तांदूळ हा देखील काही प्रक्रिया करुन चमकवला त्यामुळे हा जास्त खाणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकतो. तपकेरी भात हा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. हो या मध्ये सर्व घटक जे शरीरासाठी योग्य आहेत ते उपलब्ध असतात. हा थोडा महाग असतो म्हणून तुम्ही अर्ध तपकिरी भातला रोजच्या खाण्यात समाविष्ट करु शकता.

मित्रांनो आता पाहूया भात व चपाती हे दोन्ही पदार्थ बनवण्याची पद्धत नेमकी कशी असावी. होय यात असणारे सर्व गुणधर्म आपणास मिळण्यासाठी पुढील पद्धतीने भात व चपात्या तयार करा अथवा त्यांचे ग्रहण करा. चपाती अशीच खल्यास तुम्हाला दिवसभर कंटाळा येत राहिल. चपाती बनवताना पीठ हे योग्य प्रकारे मळले गेले पाहिजे तरच गव्हाचे सर्व गुण हे चपातीमध्ये उतरतात. सोबतच अशीच चपाती खाल्यास तुम्हाला गॅस तसेच अॅसीडीटी सारखी समस्या होवू शकते म्हणून शक्यतो चपाती तूप किंवा तेल लावून मग बनवून भाजी सोबत खावी.

हे वाचा:   कुरळे केस फक्त दोनच दिवसात होतील सरळ, हे पाणी केसांना लाऊन ठेवा.!

या सोबतच बाजारात मिळणार मल्टीग्रेन आटा देखील मुबलक प्रमाणात जीवनसत्वांनी भरलेला असतो. याचा देखील वापर तुम्ही रोजच्या वापरासाठी करु शकता. मित्रांनो भात बनवताना अनेक वेळा आपण भातात असणारे सुरवातीचे पाणी आपण काढून फेकून देतो. मात्र असे केल्याने यातील सर्व महत्वाचे घटक निघून जातात. म्हणूनच असे करणे टाळावे. रात्रीच्या जेवणासाठी जर तुम्ही भात बनवत असाल तर यात काळी मिरी तसेच कडीपत्ता नक्की टाका.

याचे कारण म्हणजे भात हा थंड असतो व याचे ग्रहण रात्री केल्यास तुम्हाला पचनक्रियेच्या अनेक संकटांना सामोरे जावे लागेल मात्र काळी मिरी व कडीपत्ता हे दोन घटक भाताला योग्य गरमी प्रदान करतात आणि तो पचण्यासाठी अत्यंत योग्य बनतो. चपाती व भात हे दोन्ही घटक आपल्या आहरात उपयुक्त आहेत. मात्र त्यांना योग्य पद्धतीने खाणे हे महत्वाचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.