ह्या वर्षी थंडीत हातपाय, कंबर दुखी आजिबात होणार नाही, कारण हा जबरदस्त घरगुती उपाय आहे तुमच्या साथीला.!

आरोग्य

आज आम्ही तुमच्यासाठी असा जबरदस्त उपाय घेऊन आलोय त्यामुळे तुमचे गुडघेदुखी, सांधेदुखी, हातातील नसा जर दुखत असतील तर तुम्हाला झटपट आराम मिळेल. जी गोष्ट गोळ्या मध्ये असते त्याच गोष्टी आम्ही उपायांमध्ये वापरल्या आहेत. पूर्वीपासून हा उपाय चालत आला आहे. जेंव्हा तुम्ही काही खाता पोटामध्ये उष्णता पडते. अनेक गोळ्यांचे सेवन करून देखील काहीजणांना काहीही फरक पडला नसेल.

त्यावर हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून पहा. आज उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो लहानांपासुन मोठ्यांपर्यंत कोणीही लावू शकते… कोणत्याही ऋतूत. सलग सात दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला अत्यंत फरक पडेल. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. हे खूप जास्त प्रमाणात बनवून ठेवू नये लागेल तसे थोडे थोडे बनवावे.

आलं एक इंच, लवंग 6-7, मेथी दाणे एक चमचा, ओवा एक चमचा, लसून 7-8 पाकळ्या, एक छोटा तुकडा दालचिनी… या वस्तू गोळा करून घ्या. या सर्व वस्तू घ्या. लोखंडाची कढई घ्या. त्यात मोहरीचे तेल पाव कप घाला. तेल गरम न करता त्यात लसूण, आलं, मेथी दाणे, ओवा, दालचिनी घाला. कढई वर झाकण ठेवून मंद आचेवर ठेवावे. मधून मधून मिश्रण ढवळावे. 10 मिनिटांनी लवंग कुटून पावडर बनवून शेवटी त्यात घाला.

हे वाचा:   सकाळी उठल्यानंतर हे एक काम करा, बघता बघता वजन कमी होत जाईल, वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय.!

पुन्हा 5 मिनिट झाकण ठेवून गॅस बंद करा. पूर्ण रात्रभर हे तेल झाकण बंद करून ठेवावे. सकाळी हे तेल गाळून घ्या. एका बाटलीत बंद करून ठेवा. हे तेल गरमी, सूज येणे यावर वापरू शकता. हे तेल एक महिना जाते. तीळ तेल वापरू शकता. जास्त बनवू नका. हे तेल जिथे दुखत आहे त्या ठिकाणी हलक्‍या हाताने मालिश करत लावावे.

शेतातील नक्की वापरून पहा सलग सात दिवस वापरल्याने तुम्हास फरक जाणवेल. परंतु हे तेल लावल्यावर ती एसी कुलर च्या थंड हवेत बसू नये. फ्रीजमधील थंड पाणीही पिऊ नये. ही काळजी मात्र घ्यावी. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   आज पासून घरात एकही मच्छर आढळणार नाही.! कारण हा उपाय मच्छरांचा पण बाप आहे.! याच्या सुगंधाने एक पण मच्छर घरात येणार नाही.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *