मित्रांनो, आम्ही तुम्हाला नेहमीच वेगवेगळ्या वनस्पती विषयी माहिती देत असतो. आज आम्ही ही माहिती ची शृंखला पुढे नेत एक अशा दुर्लक्षित आणि किरकोळ समजल्या जाणाऱ्या वनस्पती चे फायदे तुम्हाला परिचय करून देणार आहोत. ती म्हणजे थुहर. याला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावे आहेत. जसे की, हिंदी – तिधारा सेंहुण, तिधारा थूहर..मराठी- तिधारी, नवदुंगा.
संस्कृत – वज्रतुंदी, वज्राकांतका..इंग्रजी- एन्सीएन्टस यूर्फोब. चवीला कडू असलेली ही वनस्पती गाऊट च्या समस्या मध्ये उत्तम उपाय आहे. गाऊट म्हणजे एक प्रकारची सांधेदुखीच आहे ज्यात जॉईंट सांधे सुजून दुखतात व सतत खाज येते. लघवीतील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यास हा रोग उद्भवतो. अशी समस्या असल्यास या वनस्पतीच्या खोडा पासून तयार केलेल्या कढ्याचे नियमित सेवन केल्याने हा त्रास हळूहळू कमी होतो मग काही दिवसांनी मुळापासून संपतो.
याचे प्रमाण 20ml ते 40 ml असावे. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे कान दुखीची समस्या असल्यास तिधारा सेंहुण च्या फांदीचा रस काढून 1-2 थेंब कानात टाका. असं केल्याने कानदुखी मध्ये आराम मिळेल. आपल्यापैकी असंख्य लोक हे पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता, गॅस होणे, ऍसिडिटी यासारख्या पोटाच्या तक्रारी ने त्रस्त आहेत. आणि सर्व आजारांचे मूळ हे पोट साफ न होणे मध्येच आहे.
पोटा संबंधीच्या सर्व तक्रारींवर या वनस्पतीच्या मुळांचा काढा करून पिल्याने आराम मिळतो. मेंदू नर्व्ह संबंधीच्या सर्व तक्रारींवर ज्यात बेल्स पाल्सी, विसरण्याचा आजार, सेरेब्रल पाल्सी, पर्किंसन्स डिसिज इत्यादीमध्ये या वनस्पतीचा प्रयोग केला जाऊ शकतो. यात तिधारा चे लेटेक्स (दूध) चा प्रयोग करतात. खोड रगडून एक दूधिया तरल पदार्थ निघतो ज्याचा प्रयोग या रोगात होतो.
हेच दूध दात दुखी ची समस्या देखील ठीक करते. सोबतच जर जखम भरून येत नसेल तर तीदेखील भरून येईल. अस्थमा, खरुज यांसारख्या रोगांमध्ये देखील त्या वनस्पतीचा प्रयोग केला जातो. परंतु याचा प्रयोग मात्र जाणकार वैद्याच्या निगराणीखालीच करावा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.