अंडी खाऊन टरफले फेकणारे एकदा नक्की वाचा.! टरफलाचा असा उपयोग तुम्हाला कोणीच सांगणार नाही.! कधी विचारही केला नसेल असा करता येतो वापर.!

आरोग्य

मित्रांनो आपल्याकडे जवळपास प्रत्येक घरामध्ये अंडे खाल्ले जाते. राहिलेले टरफले आपण फेकून देतो. परंतु आज पासून ही टरफले फेकून देण्याची चूक तुम्ही कधीही करू नका. अनेक विविध प्रकारच्या आजारांवर रामबाण उपाय तसेच सौंदर्यासाठी वरदान ठरणारी ही अंड्याची टरफले याचे एक नाहीतर अनेक फायदे अत्यंत उपयुक्त आहेत.

‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ‘ असा मनात विविध प्रोटिन्स आणि विटामिन्स ने युक्त असलेले अंड आपण नेहमी खात असतो. तितकेच उपयुक्त असे अंड्याचे हे टरफले असतात याबद्दल आपणाला फारशी माहिती नसते. अंडी खाऊन झाल्यानंतर उरणारे टरफले ही तुम्ही स्वच्छ धुऊन घ्या. ती उन्हात व्यवस्थित वाळवा. स्वच्छ धुऊन वाळल्यानंतर या टरफलांची मिक्सर मध्ये घालून अगदी बारीक पावडर बनवून घ्या.

या अंडाच्या टरफलं मध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि प्रोटीन, वेगवेगळे मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. एक ते दोन चमचा असे हे अंड्याची टरफलाचे पावडर घ्या. यामध्ये थोडे थोडे करत पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट आपण आपल्या चेहऱ्यावर लावायची आहे. यामुळे तरुणपणात येणारे मुरम, डाग, फुटकुळ्या जातात तसेच पिंपल्स मुळे चेहर्याला खड्डे पडतात ते देखील भरून निघतात.

मुलं किंवा मुली कोणीही हा उपाय करू शकता. सुमारे पंधरा मिनिटे ही पेस्ट चेहर्‍यावर लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावा. भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्याने काही दिवसातच काळे डाग खड्डे समूळ नष्ट होऊन चेहरा नितळ डाग विरहीत होईल. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या प्रभावशाली गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण नेमके महागड्या रसायनयुक्त अशा घटकांचा वापर केलेले उत्पादन वापरून आपले सौंदर्य अजूनच धोक्यात घालतो.

हे वाचा:   झुरळांचा कायमचा बंदोबस्त झाला.! घराच्या या कोपऱ्यात कणीक मळून त्यात ठेवावी ही एक वस्तू.! घरात एकही झुरळ दिसणार सुद्धा नाही.!

यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन देखील निघून जाईल. एखाद्या स्क्रब प्रमाणे हे काम करते. हा उपाय तुम्ही हातापायांच्या त्वचेवर देखील करू शकता. हाताचे कोपरे पायाचे घोटे यावरदेखील काळपटपणा साचतो. त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय त्या जागी करू शकता. तुमच्या दातांमध्ये जर पिवळेपणा असेल तर त्याकरता अर्धा चमचा तुरटी ची पावडर बनवून घ्या त्यामध्ये आपण अशाप्रकारे बनवलेले अंड्याच्या टरफलांची एक चमचा पावडर मिक्स करा.

या पावडरीने तुम्ही दातांना मंजन घासल्याप्रमाणे दात घासा. तुमचे दात एकदम पांढरे सफेद होतील. यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. तुरटी मुळे घाण किटाणू जंतू असल्यास साफ होतात. तुमच्या दातांचा पिवळेपणा जाईल त्वरित या उपायामुळे. जर तुमच्या स्वयंपाक घरातील ॲल्युमिनियमची भांडी पांढरेशुभ्र निघत नसतील, कितीही घासून यावर काळपटपणा साठला असल्यास यासाठी काय करावे?

हे वाचा:   लसणाची एक पाकळी रात्री झोपण्यापूर्वी खा, सर्व विषारी पदार्थ झटक्यात बाहेर येईल...!

तर याकरता तुम्ही भांडे घासायला पावडरी मध्ये अथवा लिक्विड मध्ये ही अंड्याच्या टरफलाचे पावडर मिसळून एल्युमिनियम ची भांडी घासल्यास ती अगदी लखलखीत होतात. याची अगदी खात्रीशीरपणे आम्ही गॅरंटी देतो. तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल, चालताना उठताना बसताना हाडांचा कडकड आवाज येत असेल, हाड दुखत असतील तर एक चमचा ही पेस्ट एक ग्लास पाण्यामध्ये घालून ते पाणी प्यायचे आहे.

झाडांना देखील मातीमध्ये ही पेस्ट तुम्ही टाकू शकता. यामुळे झाडांची उत्तम प्रकारे वाढ होते थोडक्यात हे खतापेक्षा बेस्ट असे खत आहे. आशा आहे अंड्यांच्या टरफलांची हे अनोखे फायदे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. असे फायदे आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करायला विसरू नका. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *