झुरळांचा कायमचा बंदोबस्त झाला.! घराच्या या कोपऱ्यात कणीक मळून त्यात ठेवावी ही एक वस्तू.! घरात एकही झुरळ दिसणार सुद्धा नाही.!

आरोग्य

मित्रांनो धरतीची उत्पत्ती झाली तेव्हा अनेक छोटे-मोठे जीव जन्मास आले. काही हत्ती एवढे अवाढव्य तर काही मुंगी एवढे इवलेसे. काही पक्षांसारखे स्वच्छ तर काही मच्छर व झुरळांसारखे अस्वछ. घाणेरडे आणि घृणास्पद असणारी झुरळे रोगांना आमंत्रण देतात. झुरळे ही घाणीत वाढतात त्यांच्या पायांमध्ये रोगराई पसरवण्याची ताकद असतात. जर तुमच्या घरी कोणी ना कोणी सारखे आजारी पडत असेल तर याचे कारण झुरळे असू शकतात.

त्यांपासून संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. झुरळे हे नाव ऐकल्यावर बरेच लोक चेहरे बनवतात. कोणालाही स्वयंपाकघरात झुरळ असणे आवडत नाही. त्यांच्याकडून बरेच रोग होण्याची शक्यता देखील असते. अशा परिस्थितीत लोक झुरळांपासून
मुक्त होण्यासाठी अनेक पद्धती अवलंबतात. यातील काही यशस्वी होतात तर काही अपयशी ठरतात. झुरळांपासून मुक्त होण्यासाठी बरेच लोक केवल विक्री योग्य कृत्रीम उत्पादनांचा वापर करतात.

परंतू त्यात अनेक प्रकारची हानिकारक रसायने आढळतात. स्वयंपाकघरात फवारणी करणे हे झुरळांसाठी तसेच आपल्यासाठी सुद्धा हानिकारक आहे. मग त्यांना मुलांच्या आवाक्यापासून दूर ठेवणे देखील एक मोठे काम आहे. या परिस्थितीत काही घरगुती उपचार सर्वोत्तम आहेत. याद्वारे आपण झुरळांपासून सहज मुक्त होऊ शकता. आज आपण तुम्हाला झुरळांचा बंदोबस्त करण्यासाठी एक घरगुती व फायदेशीर उपाय सांगणार आहोत.

तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त काही पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही. हा उपाय अत्यंत नैसर्गिक आहे त्यामुळे या उपायाचा काही अपाय तुम्हाला झालेला दिसणार नाही. आपल्या स्वयंपाक घरातील काही सामग्री वापरुन आपल्याला हा उपाय करायचा आहे. चला तर जास्त वेळ न घालवता जाणून घेऊया हा उपाय. हा झुरळ्यांचा बंदोबस्त करण्याचा रामबाण उपाय करण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला गरज भासेल ती म्हणजे चार मोठे चमचे गव्हाच्या पीठाची.

हे वाचा:   लाखो रुपये वाचवणारे पान, मरेपर्यंत कधी दुखणार नाही गुडघे, हातपाय, कंबर दुखी.! सगळ्या गोळ्या औषधे द्यावे लागतील फेकून.!

उंदिर, घूस, मुंग्या तसेच झुरळे हे सर्व उपद्रवी कीटक आहेत. या सर्वांनाच गव्हाचे पीठ फार आवडते. म्हणून या गव्हाच्या पीठाचा समावेश आपल्याला या उपायात करायचा आहे. या नंतर उपायासाठी दुसरा घटक तुम्हाला आवश्यक असेल तो म्हणजे साखर. साखर हा देखील उपद्रवी कीटकांचा आवडता पदार्थ आहे. साखरेच्या काही कणांसाठी देखील हे अनेक परिश्रम करतात हे आपण जवळून पाहिलेच असेल.

म्हणूनच दोन चमचे साखर या उपायासाठी घ्यायचे आहेत. तिसरा व या उपायासाठी महत्वाचा घटक असणारा घटक म्हणजे बोरीक पावडर आपल्या अन्न-धान्यांना कीड लागू नये म्हणून आपण ही बोरीक पावडर टाकतो. बोरीक पावडर अजिबात विषारी नसते. मात्र तीचा उग्र वास झुरळांना व इतर उपद्रवी किटकांना अजिबात सहन होत नाही व याचा वास येताच ते ती जागा सोडून दूर पळू लागतात.

हे वाचा:   कधीपर्यंत जीवाशी खेळणार.! शिळे झालेले किंवा रात्रीचे उरलेले जेवण सकाळी करत असाल तर.! हा लेख फक्त तुमच्यासाठी.!

बोरीक पावडर तुम्हाला अगदी कमी किमतीत बाजारात सहज उपलब्ध होईल. तुम्हाला फक्त तीन मोठे चमचे एवढ्या मात्रेत बोरीक पावडर घ्यायची आहे. आता चार मोठे चमचे गव्हाचे पीठ, दोन मोठे चमचे साखर व तीन चमचे बोरीक पावडर यांना एका पात्रात एकत्रित करा. यांना पाण्याच्या मदतीने मळून घ्या. पीठात साखर, बोरीक पावडर टाका व पीठाचे छोटे-छोटे गोळे बनवून घ्या. आता या गोळ्यांना जिथे जास्त झुरळे या जा करतात त्या ठिकाणी ठेवा.

यांच्या वासाने झुरळे तुमच्या घरातून काढता पाय घेतील व काही दिवसातच तुमचे घर झुरळांपासून मुक्त होईल. बाजारातील रासायनिक पदार्थांची फवारणी करणे शरीरासाठी देखील हानिकारक असते म्हणूनच हा अत्यंत सोपा व नैसर्गिक उपाय करा व तुमचे घर झुरळांपासून कायमचे मुक्त करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.