आज आम्ही तुमच्यासोबत सांधेदुखीमध्ये काळजी कशी घ्यावी आणि या दुखण्या मध्ये कशाप्रकारे एक रामबाण तेल बनवावे या बद्दल माहिती देणार आहोत. सोबतच पाहणार आहोत काही टिप्स ज्यामुळे तुम्हाला सांधेदुखी मध्ये आराम मिळेल. वयोमानानुसार नियमित व्यायामाच्या अभावामुळे शरीर कमकुवत होत जाते त्यामुळे हाडं, सांधे दुखी, कंबर दुखी हे होणे स्वाभाविकच आहे.
एक गोष्ट लक्षात घ्या, सांधे दुखणे आणि सांध्यांवर सूज येणे या दोन्ही बाबी वेगळ्या होत. वेगवेगळ्या आजारांमुळे तापामुळे अंग दुखणे यामुळेही सांधे दुखू शकतात आणि संधिवात, कर्करोग तसेच म्हातारपणामुळे सांध्यांवर सूज येऊ लागते. एका संशोधनानुसार या दुखण्याच्या प्रमाणात पुरुषांच्या तुलनेने स्त्रिया अग्रगण्य आहेत. स्त्रियांच्या हाडांची जास्तच झीज होते.
हाडं मोडून फॅक्चर होणे यामुळे सांधा दुखावतो. तर दीर्घकाळ चालणारा, ऋतूप्रमाणे कमीजास्त होणारा आणि समूळ उपचार शक्य नसलेला असा आजार उद्भवल्यास तीव्र सांधेदुखी जाणवते. यामुळेच सांधे आखडून शरीरास विकृती निर्माण होते. सूज-वेदना कमी करणा-या अनेक औषधांपैकी, तेलापैकी बरेच औषधांचा प्रयोग करून झालेला असतो. तरी देखील अनेकांना म्हणावा तसा गुण येत नाही.
होमिओपॅथी आणि ॲक्युप्रेशर ने काही जणांना तात्पुरता गुण आल्याचे आपण ऐकतो. जड ओझे उचलण्याचे काम करणारे लोकं, वयस्कर लोकं, लठ्ठपणा असणारे, स्त्रिया, कांद्याला गुडघ्याला मार लागलेला असणारे अशा विविध प्रकारच्या लोकांमध्ये सांधे दुखणे सूज येणे ही समस्या जास्त प्रमाणात बघायला मिळते.
गुडघ्याचे झीज होणे, हाडं ठिसूळ होणे हे यामागचे प्रामुख्याने एक महत्त्वाचे कारण होय. हाडांमधून कटकट आवाज आल्यास, जिना चढ-उतार करण्यास गुडघे दुखू लागल्यास समजून जावे आपल्याला सांधे रोगाच्या आजाराची ही धोक्याची घंटा वाजली आहे. हे आज-काल फार कमी वयात दिसून येणारी लक्षणे होत. असा त्रास होऊ नये यासाठी आहाराचे विशेष महत्त्व आहे त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.
कॅल्शियम फॉस्फरस मॅंगनीज झिंक लोह यांसारखे पोषक घटक असणारे अन्न जास्तीत जास्त सेवन केले पाहिजे. नियमित सूर्यप्रकाश शरीराला मिळाला पाहिजे. हलका व्यायाम चाळीस मिनिटे चालणे अत्यंत गरजेचे आहे. बाजारामध्ये अनेक विविध प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. परंतु आज आपण घरगुती काही घटक वापरून तेल कसे बनवायचे आणि ते कसे वापरायचे याबद्दल माहिती घेऊयात.
या उयासाठी आपल्याला लागणार आहे पिकलेले धोत्र्याच्या फळातील बिया लागणार आहेत. याकरिता सर्वप्रथम पिकलेल्या धोत्र्याच्या फळातील बिया वेगळ्या काढून त्या सुकवा. हे करतेवेळी सावधगिरी बाळगा कारण या बिया विषारी असतात. दोन चमचे धोत्र्याच्या बिया, एक चमचा मेथी दाणे, एक चमचा ओवा कढई मध्ये घ्या. यामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित भिजतील इतक्या प्रमाणात मोहरीचे किंवा तिळाचे तेल घालावे.
चमच्याने हे एकत्र करून गॅसवर मंद आचेवर गरम करा. यामध्ये सात आठ सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घाला. सुमारे दहा ते बारा मिनिट सतत चमच्याने हलवून उकळल्यानंतर हे तेल तयार होईल. गाळून घेऊन हे बाटलीत भरून ठेवा. लावते वेळी वाटीत थोडे काढून थोडेसे कोमटसर करून घ्या. शरीरातील कोणत्याही सांध्यांचे दुखणे असल्यास हे तेल तुम्ही लावू शकता. रात्री तेल लावून तासाभराने सुती फडके बांधावे.
त्यामुळे इतर कपडे खराब होणार नाहीत. सकाळी गरम पाण्याने अंघोळ करावी. नियमित या उपायाने तुम्हाला खूप फरक जाणवेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.