बीपी च्या पेशंट साठी अमृत आहे हे, मुळापासून बीपी चा त्रास होईल कमी, सर्व गोळ्या कराव्या लागतील बंद.!

आरोग्य

शीर्षक वाचून आश्चर्यचकीत झालात ना? होय, हे शक्य आहे उच्च रक्तदाब मुळापासून नष्ट करता येऊ शकतो. सर्वप्रथम रक्‍तदाब म्हणजे काय? हाय ब्लड प्रेशर लो ब्लड प्रेशर नेमके म्हणजे काय? त्यामुळे कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात आणि यावर काही उपाय आणि टिप्स याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. मित्रांनो आपल्या शरीरात जे रक्त वाहत असते हे रक्त ज्या मधून वाहते त्यांना रक्तवाहिन्या म्हणतात.

रक्त वाहत असताना रक्तवाहिन्यांवर आतील बाजूने एक विशिष्ट दाब(pressure)निर्माण करते, त्यालाच आपण रक्तदाब म्हणून ओळखतो. सर्व साधारणपणे 18 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीचा नॉर्मल रक्तदाब 120/80 असतो तर, वय वर्षे चाळीस यानंतर तो 140/90 असतो. मधील पहिला अंकाला सिस्टोलिक ब्लड प्रेशर तर दुसर्‍या अंकाला डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतात.

सिस्टोलिक रक्तदाब म्हणजे जेव्हा हृदय संकुचित होऊन रक्तवाहिन्यांमध्ये पंप करते तसेच डायस्टोलिक रक्तदाब म्हणजे हृदय विश्रांती घेते आणि यावेळी रक्त हृदयात भरले जाते. वर नमूद केलेल्या रेंज पेक्षा जास्त आकडे मशीन वरती दिसु लागले की उच्च रक्तदाब आहे असे समजावे. परंतु अचानक एका रात्रीत उच्च रक्तदाब होत नाही. त्यासाठी तुमच्या शरीराने तुम्हाला आधी बर्‍यापैकी सूचना दिलेल्या असतात.

हे वाचा:   डोळ्यांची नजर वाढवून चष्मा काढून टाकेल हा घरगुती उपाय...! आता आंधळ्या व्यक्तीला पण दिसू लागेल.!

जसे श्वास घेण्यामध्ये अडचण येणे, छातीवर ओझे असल्यासारखे वाटणे, अनेकदा सलग चक्कर येणे, लघवीवाटे रक्त जाणे, नाकातून रक्त येणे, स्वतःची अकारण डोकेदुखी यांसारख्या अनेक समस्या उच्चरक्तदाब मध्ये आढळतात. तुम्हाला देखील अशा समस्या आढळून आल्यास तुम्ही खात्रीसाठी वेळीच रक्‍तदाब तपासून पहायला हवा.

उच्च रक्तदाबाच्या त्रासाला वैद्यकीय भाषेमध्ये ‘सायलेंट किलर’ असेदेखील म्हटले जाते. आहारामध्ये अति मिठाचे आणि गोड पदार्थांचे सेवन असणे. तणावग्रस्त जीवनशैली असणे. अनेक प्रकारचे शरीराला घातक असे बेकरी प्रोडक्ट नेहमी खाणे. अति प्रमाणात मांसाहार करणे. लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, मद्यपान ठरू शकते तुमच्या शरीराला उच्च रक्तदाब देण्याचे कारण.

सहाजिकच तुम्हाला दैनंदिन आहारात बदल करून प्रथमतः वजन घटवले पाहिजे. आहारामध्ये सोडीयम /मीठ प्रमाण अत्यंत कमी करा. ताज्या भाज्या फळं यांचा समावेश वाढवून मांसाहाराचे प्रमाण कमी करा. दररोज अर्धा तास तरी चालणं रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते. भोपळ्याच्या बिया खरबुजाच्या बिया यांचा आहारात समावेश करा.

रक्तदाबाच्या गोळ्या घेत असल्यास धूम्रपान मद्यपान हे आरोग्यासाठी ठरू शकते घातक. कोणतीही परिस्थिती असुदे मानसिक ताणतणावापासून दूर रहा. आवडते छंद जोपासा, योगा करा. आता पाहुयात घरगुती उपाय ज्यामुळे तुम्ही ठेवू शकता उच्च रक्तदाब नियंत्रणात. यासाठी तुम्हाला लागणार आहे सुके अंजीर. दोन सुके अंजीर रात्री भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन चावून करून ते पाणी प्या.

हे वाचा:   मासे बनवण्याची ही रेसिपी एकदा बनवून बघा.! मासे इतके चवदार बनतील की खाणारे खातच राहतील.!

यासोबत एक ग्लास गाईचे दूध प्या. सलग सात दिवस हे करून बघा. दुसरा उपाय 200ml पाणी गरम करण्यास ठेवा. यामध्ये 10-12 कढीपत्ता पान स्वच्छ धुवून घालून पाच ते सात मिनिटे पाणी उकळवा. त्यामुळे कढीपत्ताचे सर्व पौष्टिक गुणधर्म त्या पाण्यात उतरतील. हे सकाळी बनवून ठेवा. आणि हे पाणी गाळून घ्या. पूर्ण दिवसामध्ये थोडे थोडे करून तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे.

या सोबत तुमच्या नेहमीच्या जा गोळ्या चालू असतील तर त्या घेत राहा. सांगितलेल्या उपाय याच पद्धतीने आणि टिप्स देखील तुम्ही अमलात आणल्यावर व्हाल उच्च रक्तदाब मुक्त..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *