हात-पाय कंबरदुखी म’रेपर्यंत विसरा, सातच दिवस लावा, कायमचा फरक पडेल, आजपर्यंत ची सर्वात पावरफूल जडीबुटी.!

आरोग्य

मंडळी शीर्षकात निवडुंगाचे नाव ऐकून आश्चर्यचकित झालात ना? होय, पण हे खरं आहे. निवडुंग सारखी दुर्लक्षित वनस्पती देखील इतकी लाभदायी असते..! याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. आयुर्वेदात या वनस्पतीला ‘जीवनदायी’ म्हणून संबोधले आहे. निवडूंग आजकाल मात्र दुर्मिळ झाला आहे़. कमी पाण्यात वाढणारी आणि काटेदार अशी या वनस्पतीची ख्याती आहे.

हल्ली तर आयुर्वेदाने गुणगाण केलेली नागाची फणी आकाराची अथवा पंचकोनी निवडूंग डोंगरदऱ्यांतून देखील लुप्त पावत चालली आहे. पूर्वी निवडुंगाचा कुंपणासाठी वापर केला जात असे. आज आम्ही तुम्हाला या वनस्पती बद्दल आणि त्याच्या औषधी गुणधर्मा बद्दल माहिती करून देणार आहोत. या वनस्पतीला शिशिर ऋतुत फळे येतात. या निवडुंगाच्या फळात ४१ टक्के शर्करा, साडेसहा टक्के मांसजन्य घटक, ३० टक्के साखर असते व उर्वरीत भाग चोथा असतो़.

बऱ्याच भागात या फळांपासून सरबत बनवले जाते तर काही ठिकाणी ही फळे भाजून खाल्ली जातात. कफ व दम्यासाठी हे खूप लाभदायी आहे़. निवडुंगाच्या रसाच्या सेवनाने भूक वाढते. अनेक प्रकारच्या मूत्र विकारात ही वनस्पती वरदान आहे. डोंगराळ आदिवासी भागात निवडुंगाची बोंड आवडीने खाल्ली जातात. म्हणून याला रानमेवा म्हणलं तर वावगं ठरू नये.

हे वाचा:   शुगर 450 असो की 550.. सकाळी फक्त एक चमचा खा.. सात दिवसात रिपोर्ट नॉर्मल येतील.!

निवडुंग तोडला तर त्यातून पांढरा व दाट असा दुग्धजन्य पदार्थ निघतो, तो यातील मुख्य द्रव्य म्हणजेच चीक होय. फार पूर्वी प्लेग रोगात गाठ यायची त्या गाठीवर हा चीक लावला जाई आणि त्यावर निवडुंग बांधत असत. त्यामूळे प्लेग बरा होत असे. निवडुंगाच्या वाळलेल्या चिकास ‘फरफीयून’ असे म्हणतात. आता पाहूयात कोणत्या प्रकारे कसा वापर केला असता निवडुंगाचे आपल्याला फायदे लाभतील.

१. सुज येणे व मूळव्याध – सुजेवर निवडुंगाचे तेल म्हणजे संजीवनी औषधच आहे. मग सूज कोठेही आलेली असु देत , निवडुंग ठेचून घ्या. बारीक वाटून कोमट करून घेऊन सुजेवर बांधल्याने सूज तात्काळ कमी होते. मूळव्याधीवर देखील याच पद्धतीने बारीक वाटून कोमट करून बांधल्याने मूळव्याधही एकदम ठीक होते.

२. चिघळलेली जखम होणे व गळू, गाठ येणे – जखमेत निवडुंग वाटून कोमट करून वर बांधल्याने जखम लवकर बरी होते शिवाय यात घाण पू किडे होत नाही. गळू गाठ आल्यास त्यावर निवडुंगाचा चीक लावा व निवडुंग वाटून, कोमट करून बांधावा.. गाठ ताबडतोब फुटते.

३. सांधेदुखी /हाडं /हातपाय /कंबर दुखी असल्यास व गजकर्ण /खरूज झाल्यास – निवडुंगाचे तुकडे करून ते चांगले ठेचून घ्या आणि या ठेचाच्या आठपट खोबरेल तेल घालून, तेलाच्या आठपट ताक घालून भिजवा, हे पाणी आटून नुसते तेल होईल ते गाळून घ्यावे. हे निवडुंगाचे तेल दुखणाऱ्या भागावर लावावे. गजकर्ण खरूज झाल्यास हे तेलात मिसळून लावतात.

हे वाचा:   हे तेल आहे केसांसाठी संजीवनीच, केस इतके वाढतील की विचारताना कंटाळा येईल...केस गळती त्वरित थांबली जाईल...!

४. जुनाट ताप असल्यास – अनेक दिवस ताप अंगात राहिला तर निवडुंगाच्या चिकाचे चार थेंब घ्या. हे भाजलेल्या हरभऱ्या डाळीच्या पिठात घालून गोळ्या बनवा. त्याचे नियमित आठवडाभर सेवन करा. असे एक ना अनेक फायदे आहेत या वनस्पतीचे.. हृदयरोग, पोटाच्या तक्रारी, मुत्राशयाचे रोग यात देखील उत्तम आहे ही वनस्पती. अंगातील शक्ती वाढवण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. तूर्तास इतकेच.

अशा आहे आज दिलेली वेगळी माहिती तुम्हाला नक्कीच चकित करेल! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *