हे तेल आहे केसांसाठी संजीवनीच, केस इतके वाढतील की विचारताना कंटाळा येईल…केस गळती त्वरित थांबली जाईल…!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या बदलत्या जीवनशैली च्या जीवनात केस गळतीची समस्या ही अगदी सर्वसाधारण बाब आहे. केस गळतीचे अनेक कारणं आहेत. शरीरात विटामिन, प्रोटीन ची कमतरता, रात्री उशिरा झोपणे, पुरेशी झोप नसणे, आहारातील असुसूत्रता, रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा वाढता बेसुमार वापर, व्यसन आणि अनुवंशिकता..!

उष्णतेने कोंडा होणे, केस गळणे, अकाली केसं पिकणे, टक्कल पडणे, चाई लागणे, केसांची वाढ खुंटणे, केसांना फाटे फुटणे, केस निस्तेज होणे, असे एक ना अनेक केसांच्या तक्रारी उद्भवतात. लहान मुलांपासून वयस्करां पर्यंत आजकाल केसांच्या तक्रारी आपल्याला बघायला मिळतात. बाजारात अनेक विविध उपचार केसांच्या तक्रारी वर उपलब्ध आहेत. ते सर्वांच्या खिशाला परवडतील असे नाही.

आज आपण बघणार आहोत केस गळती रोखून ते लांब सडक, मऊ, रेशमी, चमकदार बनवण्यासाठी चा उपाय. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्ची घाणी चे मोहरी तेल लागणार आहे. 50ml मोहरी तेल घ्या. विटामिन अ, विटामिन ड,अल्फा फॅटी ऍसिडचा प्रचंड स्रोत यात असतो. ज्यामुळे आपले केस गळती थांबते, केस मजबूत करते आणि केस काळे होण्यास आपली मदत करते.

हे वाचा:   खाज, खरुज, नायटा, गजकर्ण यावर करा आता शेवटचा इलाज, पुन्हा जांघेत खाज येणार नाही.!

हे 50 ml मोहरीचे तेल मंद आचेवर ती ठेवून गरम करावे. त्यात कडीनींबाचे 10 पाने स्वच्छ धुवून चुरून घालावीत. कडूनिंबाच्या पानांच्या मध्ये असलेल्या गुणधर्मामुळे केसातील कोंडा जाऊन फंगल इन्फेक्शन थांबण्यास मदत होते. स्काल्प निरोगी राहते. परिणामी केस कमी गळतात. मऊ, रेशमी, चमकदार, लांब केस आपल्याला मिळतात. ( कडुनिंबाचा पाला उपलब्ध न झाल्यास तुम्ही कडुनिंबाचे तेल म्हणजेच निम तेल हेही यात घालू शकता )

पानं काळी होईपर्यंत सुमारे दहा मिनिटे हे तेल उकळावे. सुमारे चोवीस तास हे असेच ठेवून गाळून घ्यावे. आणि हे तेल काचेच्या बाटलीत भरून ठेवायचे आहे. रोज संध्याकाळी झोपताना या तेलाने तुम्ही हलक्या हाताने केसांची मालिश करा. केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत हे तेल सबंध लावायचे आहे.

हे वाचा:   हळू हळू टक्कल पडत असणाऱ्या पुरुषांनी एकदा नक्की वाचा, तुमच्यासाठी काही भन्नाट उपाय.!

सकाळी उठून शाम्पूने तुम्ही केस धुवा. केस धुताना गरम अतिकडक पाण्याचा वापर करू नये. शक्यतो केस धुताना आयुर्वेदिक शाम्पू वापरल्यास उत्तम. अशा या तेलाचा उपाय केल्याने पंधरा दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल. हे तेल आपण नेहमी वापरू शकतो याला कुठलाही साईड इफेक्ट नाही.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *