या मिश्रणाचा असा करा वापर.! हाडदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी, हात-पाय आणि सांधेदुखी सर्व दुखणं ओढून बाहेर काढेल.!

आरोग्य

मित्रांनो, सांध्याना सूज येणे, सांधे हाडं दुखत राहणे, हाताचे व छोटे सांधे सकाळी आखडणे, दुखणे व नंतर दिवसभर हळुहळू सांध्यांना बरे वाटणे सांधेदुखीची लक्षणे असतील तर समजावे की हा रिम्युटाइट आर्थरायटिस अर्थात अनुवांशिक अथवा तारुण्यातील सांधेदुखीचा आजार आहे. हातापायांचे लहान सांधे सुजणे, दुखणे ही प्राथमिक लक्षणे.

उतारवयात संधिवात होणे साहजिक आहे. शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता, हाडांचा ठिसूळपणा यामुळे अप्रत्यक्षरित्या सांधे निकामी होऊ लागतात. नियमित व्यायाम, वजन व आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास सांध्यांवर येणारा भार कमी करून सांधे व स्नायू बळकट ठेवता येतात. हाडांची झीज झाल्याने गुडघेदुखी, कंबरदुखी मानदुखी डोके वर काढते.

पण, यावर नैसर्गिक पद्धतीने उपचार केले तर आराम मिळतो. हे उपचार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्याच पण खालील नैसर्गिक घरगुती उपचार पद्धती तुम्हाला आराम देऊ शकतात. पाहुयात उपाय आणि काही उपयोगी टिप्स. या उपायात आपल्याला प्रामुख्याने लागणार आहे देशी बाभुळचा डिंक, खसखस.

हे वाचा:   तांबे, पितळाचे भांडे जास्त घासत बसायचे नाही.! त्यावर टाकायचा हा एक पदार्थ तिसऱ्या मिनिटाला भांडी चमकू लागतात.!

कोणत्याही किराण्याच्या दुकानात तुम्हाला या वस्तू आरामात मिळतील. खसखस आपल्या हाडांना बळकटी देण्यात आपली मदत करते. कढाई मध्ये पाव चमचा शुद्ध साजूक तूप घालून कढई गरम करायला ठेवा. यात १०-१५ बदाम घाला व १० काजू घालून मंद आचेवर दोन मिनिटांसाठी पासून घ्या. बाहेर काढा. त्यानंतर यात एक वाटी मखाने याच पद्धतीने तुपात भाजून घ्या.

आता यात दोन चमचे डिंक तुपात भाजून घ्या. यात एक चमचा खसखस घाला. एका भांड्यात चवीनुसार गोडीसाठी गुळ घाला आणि एक कप पाणी घालून गरम करा. गुळ वितळेल. या गुळाच्या गरम पाण्यात बदाम, काजू( मिक्सर वर भरड वाटून )खसखस, मखाने, डिंक याच्या मिश्रणात घाला. आपला उपाय तयार. आपण याचे सेवन करू शकता.

लहान मुलांसाठी थंड दुधात हे मिश्रण मिक्स करावे. लक्षात ठेवा हे गरम दुधात घालू नये. गुळामुळे दूध नासण्याची शक्यता असते. तेवढी काळजी घ्या. चवीला अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर लागते. याशिवाय आपल्या हाडांना मजबुती बळकटी मिळते. आठवड्यातून दोन वेळेस असा प्रयोग केल्याने तुमचे सांधेदुखी हाड दुखी, हात पाय दुखी, कंबरदुखी होईल त्वरित गायब.

हे वाचा:   फक्त एक चमचा दुधात मिसळून रात्री झोपताना लावा.! तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल.! चेहरा कमाल होईल.!

अशक्तपणा कधीच जाणवणार नाही. शांत झोप लागेल. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. टिप्स: १. थंड पाणी /एसी टाळावे. २. आंबट चिंच, टोमॅटो, दही वर्ज्य करावे. ३. नैसर्गिक व्हिटॅमिन डी साठी कोवळ्या सूर्यप्रकाशात बसावे. ४. आहारात वंगनसाठी एक चमचा साजूक तुपाचा रोज समावेश असावा. ५. व्यायाम / मैदानी खेळ यासाठी वेळ द्या.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *