मित्रांनो, प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं आणि दीर्घकाळापर्यंत तरुण दिसावं असं वाटत असते. यासोबतच आपली प्रकृती देखील चांगली राहावी. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सुचवत आहोत की ज्यामुळे तुमची तब्येत आणि सौंदर्य राहील अबाधित. काही दिवस हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. शिवाय तुमचे केस देखील होतील सुंदर.
या उपायासाठी तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरातील काही असे घटक घ्यायचे आहेत की तुमच्या शरीरासाठी ते अत्यंत पौष्टिक आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल याशिवाय हाडं मजबूत होतील आणि शरीरातील विकनेस जाईल. तुम्हाला सांधेदुखीचा त्रास कधीच सतावणार नाही. जाणून घ्या कोणते आहेत ते घटक?
त्यासाठी लागणारा पहिला घटक म्हणजे हिरवे मूग. मूठभर मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजवून मोड आणा. अशा मुगाचं सेवन तुम्ही दररोज केल्याने डोळ्यांची नजर तेज होते. रक्ताची कमतरता दूर होते. भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने नियमित मुगाचे सेवन अनेक रोगांपासून आपला बचाव होतो. मोड आणून मूग खाल्ल्याने याचे पौष्टिक गुणधर्म दुपटीने वाढतात. दुसरा घटक म्हणजे हरभरा.
आपले पूर्वज अशाच प्रकारे चांगल्या पद्धतीचे खाणेपिणे ठेवून आपल्या शरीराची काळजी घेत. पाण्यामध्ये अशाप्रकारे कडधान्य भिजवल्याने त्यांचे पोषक तत्व गुणधर्म अजून वाढतात. मुगाप्रमाणे हरभरे देखील भिजवून मोड आणून घ्या. तिसरा घटक आहे बदाम. अनेक प्रकारचे विटामिन्स मिनरल्सच्या पोषक तत्वांचा खजिना म्हणजे बदाम. हाडांचे दुखणे, सांध्याचे दुखणे होईल गायब. केसं त्वचा यांना होईल भरघोस फायदा.
तीन ते चार बदाम पाण्यात भिजवा. बदाम देखील पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्याचे पोषक तत्व अजून वाढतात. शिवाय पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम थंड प्रकृतीचे असतात, तर सुके खाल्लेले बदाम उष्ण असतात. चौथा घटक आहे, किसमिस, बेदाणे. लोहाचे भंडार म्हणजे बेदाणे. यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
अर्धी मूठ किसमिस स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी उठल्यानंतर किसमिस खाण्यासोबत हे पाणी देखील प्यावे कारण, या पाण्यात सगळे पोषक तत्व येतात. पाचवी वस्तू आहे, शेंगदाणे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई याचा उत्तम स्रोत आहे दाणे. यामुळे तुमचे त्वचा देखील चमकते. तर असे दाणे देखील तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवा.
भरपूर प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. या पाच गोष्टी तुम्ही पाण्यात भिजवून खाल्ल्यास तुमच पोट नेहमी उत्तम राहील. जास्त जास्त रोग हे पोट साफ नसल्यामुळे होतात. पाचन क्रिया व्यवस्थित असेल तर तुमचे आरोग्य सर्वोत्तम राहील. या सगळ्या वस्तू वेगळ्या भिजवण्याचा सल्ला आम्ही देऊ. अचानक येणारा थकवा देखील होईल गायब.
सकाळी उठल्यावर नाश्ता ऐवजी याचे सेवन सलग महिनाभर अवश्य करूनच बघा. तुम्हाला आश्चर्यकारक फायदे होतील. टिप्स : अधिक चांगल्या परिणामांसाठी १. मूग, हरभरा मोड आणूनच सेवन करावे. २. भिजवलेले बदाम साल काढूनच खावे. ३. वेगळी भिजवलेली किसमिस सोबत त्याचे पाणी अवश्य प्यावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.