अंथरुणात खिळलेला व्यक्ती उठून पळू लागेल, ही जडीबुटी मानवासाठी वरदानच म्हणावे लागेल.!

आरोग्य

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी माहिती घेऊन आलो आहोत ते हूरहूर या वनस्पती बद्दल! वेगवेगळ्या भाषेत याला वेगवेगळी नाव आहेत. याची पानं संयुक्त, 3-5 दली, खालची पाने लांब देठाची असतात व मंजरीवर सप्टेंबर ते जूनमध्ये लहान पिवळी फुले येतात. फुलात 20 केसरदले असून बोंड लांबट, केसाळ, 5-6cm लांब असते. बी काळसर पिंगट, गोलसर व रेषांकित असते. बरेच जण याला जंगली जिरा म्हणतात.

मराठीत याला पिवळी/तीळवण म्हणतात. उष्ण कटिबंधात सर्वत्र वाढणारी व महाराष्ट्रात सामान्यपणे गवतासारखी आढळणारी ही लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) वनस्पती आहे. याच्या पानांचा रस कानदुखीवर कानात घालतात त्यावरून काही देशी नावे याला पडली आहेत. तसेच याच्या पानांचा रसव बी कृमिनाशक, ज्वरनाशक आणि वायुनाशी असते. इंडोनेशियात जनावरांना चारा म्हणून ही वनस्पती घातली जाते.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये मेंढ्या व कोंबड्यांना त्यापासून विषबाधा झाल्याचे आढळले गेले. याच्या चुरगळलेल्या पानांनी कातडी लाल होते व फोड येतात. तथापि डोकेदुखी, गळवे, मज्जातंतुव्यथा, संधिवात व इतर स्थानिक वेदनांवर चोळणे किंवा पोटीस बांधणे याकरिता पाने वापरली जातात. पिवळी तीळवण ही वनस्पती कडू, तिखट, उष्ण, कफवातशामक, रुचीकारक, तीक्ष्ण तसेच स्वेदल असते.

हे वाचा:   अरे बापरे.! एम-आर-आय स्कॅन कसा केला जातो माहिती आहे का.? ही माहिती कोणालाही माहिती नसेल एकदा नक्की वाचा.!

ही श्वास, कास, अरुची, ज्वर, वीस्फोट, प्रमेह, कुष्ठ, शुल, रक्त, पित्त योनीरोग मूत्ररोग कृमीरोग तथा पांडूनाशक असते. याचे बी उष्णवीर्य, जठराग्नीदीपक, आमदोष, कफ, वात ज्वर शामक, अनाह, गुल्म असतात. याची पानं वाटून मस्तकावर लेपण केल्याने डोकेदुखी थांबते. या वनस्पतीच्या पानांच्या रसात, मध, तीळ तेल आणि सैंधव मिसळून 1-2 थेंब कानात टाकल्याने कानातून येणारे रक्त पु थांबते.

याशिवाय याच्या पानाच्या रसात तुळशीच्या पानांचा रस मिसळून 1-2 थेंब कानात टाका यामुळे सर्व प्रकारच्या कान दुखीत आराम मिळतो. 15-20ml याच्या पानाचा काढा पिल्याने अतिसार मध्ये लाभ होतो. अजीर्ण, अपचन, जठराग्नी मंदावणे यात देखील फायदा होतो. या वनस्पतीचा बियांचा काढा 10-30ml पिल्याने यकृताचा संबंधित समस्या दूर होतात.

याच्या बिया वाटून सांध्यावर लेप केल्याने सांधेदुखी कमी होते. याची पानं वाटून डाग व्रण वर लावल्यास फायदा होतो. याची पानं वाटून लेप केल्याने त्वचेवर कुष्ठ, फोड, शोथ तसेच अनेक त्वचाविकार शमन होतात. 5mm हूरहूर पानांचा रस केवळ पाण्यात मिसळून सेवन केल्याने ज्वरामध्ये लाभ होतो. डोळे लाल होणे यात याची पानं ओली करून डोळ्यावर ठेवा, फायदा होईल.

हे वाचा:   लोक बघतच राहतील केस वाढत जातील.! रात्रीतून खूप मोठा चमत्कार घडेल.! हे तेल ज्याच्या घरात असेल त्याच्या केसात एकही केस राहणार नाही.!

कृमी जंत असल्यास याच्या पानांच्या रसात, सुंठ पावडर, मिरपूड मिसळून गरम पाणी सोबत गाळून प्यावे. असे एक ना अनेक फायदे असणारी आहे ही पिवळी तीळवण! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *