मित्रांनो आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या दुखण्यांवर असंख्य असे घरगुती उपचार नेहमीच सुचवत असतो. हीच माहिती शृंखला पुढे नेत आज आम्ही सांधेदुखी, कंबर दुखी, हाड दुखी, कोणत्याही प्रकारचे आतून असणारे कमजोरी, प्रचंड प्रमाणात थकवा आला असेल, कॅल्शिअमची रक्ताची कमतरता जाणवत असेल अशा एक ना अनेक विविध समस्यांवरती एक रामबाण उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ते पण अगदी मुळापासून नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय.
अगदी माफक खर्चामध्ये अजिबात हानिकारक नसलेले पदार्थ वापरून. आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपण रात्र रात्र जागून सोशल मीडियावर वेळ घालवत असतो. यामुळे तुम्हाला थकवा आणि शारीरिक दुर्बलता जाणवते. ते कदाचित तुम्हाला वेळीच लक्षात येत नसेल परंतु हळूहळू तुमचं शरीर कमजोर होऊ लागते. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडणे, डोळ्याखाली डार्क सर्कल येणे, कमरेचे दुखणे, मानेचे दुखणे,डोके दुखणे याशिवाय यौ’न संबंधी देखील अशा समस्या जाणवू लागतात.
असा उपाय करावा तसा उपाय करावा असे सांगणारे अनेक फेक माहिती तुम्हाला इंटरनेटवर खूप मिळेल. टीव्हीवर देखील तुम्ही गोळ्यांच्या अनेक जाहिराती पाहिल्या असतीलच. सकाळी आणि संध्याकाळी आमचे दोन उपाय तुम्हाला सांगत आहोत ते तुम्ही अवश्य करा. तुम्हाला विश्वास बसणार नाही इतके तुमचे शरीर ताकदवान होईल. आजकालच्या तरूण पिढीने तर हा उपाय अवश्य करावा.
हा पाय तुम्हाला सकाळी करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे चने / हरभरे, काश्मिरी बदाम. या दोनही गोष्टी रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवा. या सोबत तुम्हाला सेंद्रिय गुळ लागणार आहे. केमिकलयुक्त गुळ खाऊ नका. सकाळी उठल्यावर पन्नास ते शंभर ग्रॅम प्रमाणात भिजलेले चणे आणि दहा ते बारा भिजलेले बदाम तुम्हाला चाऊन खायचे आहेत.
यासोबतच छोटा गुळाचा तुकडा देखील तुम्हाला खायचा आहे. लक्षात घ्या बदाम कधीही कोरडे खाऊ नका शरीरात उष्णता भडकेल. हे खाऊन झाल्यानंतर तुम्ही एक ग्लास गरम दूधात केळ टाकून पिऊ शकता. यामुळे तुम्हाला जबरदस्त ताकद मिळेल. थंडीच्या दिवसांमध्ये या दुधात खजूरचा वापर करावा. लक्षात घ्या पोट साफ न होण्याची समस्या जर तुम्हाला नसेल तरच या गोष्टी तुम्हाला पचतील.
त्यासाठी सगळ्यात आधी पोट साफ कसे करता येईल त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण त्याशिवाय तुमच्या शरीरात रक्तामध्ये पोषकतत्वे जाणार नाहीत. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठा एक पोट साफ करण्याचा अत्यंत सोपा मार्ग आहे. सकाळी उठल्यानंतर रोज कोमट सर पाण्यामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण टाकून सेवन करा. योग प्राणायाम, सूर्यनमस्कार असे करा.
त्याच्यानंतर तुम्ही हे उपाय करावेत त्यामुळे या घटकांतील पूर्ण पोषणतत्वे तुमच्या शरीरात राहून तुम्हाला फायदा देतील. दिवसा कमी खा परंतु पौष्टिक असे अन्न खा. हिरव्या भाज्या, फळे, डाळी यांचे आहारात प्रमाण वाढवा. संध्याकाळी चार ते पाचच्या सुमारास चाळीस मिनिटे चालावे त्यानंतर तुम्हाला अश्वगंधा च्या मुळाची घरी बनवलेले पावडर लागणार आहे. अश्वगंधा ची पावडर बाजारात तयार देखील मिळते परंतु तुम्ही मूळ घरी आणून पावडर बनवा.
गाईच कोमट दूध घ्या त्यामध्ये एक ते दोन ग्रॅम अश्वगंधाची पावडर घाला. जास्त घालू नका त्यामुळे शरीरात उष्णता वाढेल. रात्रीच जेवण तुम्हाला साधारण सुर्यास्ताच्या आसपासच करायचे आहे. रात्रीच जेवण अगदी हलके असावे. कारण जे पचायला सोपे असते त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहता. सांगितल्याप्रमाणे गोष्टींचे पालन करा. तुमचे आजार चुटकीसरशी गायब होतील.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.