केस जमिनीवर लोळू लागतील, हे तीन पदार्थ एकत्र करून केसांना लावा आणि बघा जादू.!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे नैसर्गिक सुंदर केस लवकर खराब होऊ लागले. केसांच्या तक्रारी वाढत आहेत. अकाली केस पिकणे, अतीप्रमाणात गळणे, चाई पडणे, कोंडा होणे, वाढता केमिकल शांपू कंडिशनर हेअर कलर यांचा वापर, फाटे फुटणे, केसं रुक्ष, विरळ होणे असे एक ना अनेक केसाच्या तक्रारी बघायला मिळतात आणि आपला जीव कासावीस होतो.

योग्य ती काळजी घेऊन काही तक्रारी कमी करता येतात. पुढे होणाऱ्या महागड्या ट्रीटमेंट पासून वाचू शकता. आपण आज एक हेअर मास्क पाहणार आहोत ज्याने आपले ९०% केसांच्या समस्या संपतील. यासाठी आपल्याला लागणार आहे २-३ चमचे सब्जा चे बी घ्यायचे आहे. बहुगुणी एक चमचा सब्जा एक कप पाण्यात अर्धा तास भिजवून पिल्यावर वजन खूप लवकर कमी होते.

पोटावरील चरबी कमी होते. अंगातील उष्णता शरीराचा दाह कमी होतो. पोट साफ होते. यापेक्षा कितीतरी पटीने सब्जा बी केसांवर गुणकारी आहे. यात खूप प्रमाणात प्रोटीन असते. दुसरा घटक आपण घेणार आहोत जवस. जवसाचे जेल पण केसांसाठी खूप लाभदायक आहे. जवसामध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा ३, ओमेगा ६,ओमेगा ९ भरपूर प्रमाणात असते म्हणून आपल्या केसं आणि त्वचेला त्याचा फायदा होतो.

हे वाचा:   ग्लासभर दुधामध्ये टाका ही एक वस्तू, पुरुषांसाठी वरदान, मर्दानी ताकद जबरदस्त वाढेल

केसांची मुळे घट्ट होतात. जवस स्कॅल्प स्वच्छ करते. केरेटीन असल्याने केसं गळती रोखते. कोंडा इन्फेकशन होत नाही. २ चमचे सब्जा बी, २ चमचे जवस एक कप पाण्यात १० मिनिटे भिजवा. हे मिश्रण आपल्याला गॅस वर मंद आचेवर शिजवायचे आहे. जेणेकरून सगळी गुणधर्म त्या पाण्यात उतरतील. कमीतकमी १०-१५ मिनिटे हे गॅस वर ढवळत राहावे. हे जेल गरम असतानाच गाळून घ्यावे. थंड झाल्यावर घट्ट होऊन गाळता येणार नाही.

हे जेल बनवून तुम्ही फ्रिज मध्ये ही साठवून ठेवू शकता. नॉर्मल तापमान झाल्यावरच फ्रिज मध्ये ठेवावे. मेहेंदी.. आपल्या केसांना नैसर्गिक कंडिशनर चे काम करते. स्कॅल्प निरोगी बनवून केसांची मुळे घट्ट होतात. मेहेंदी फक्त रंगच नाही तर खूप उपयुक्त गुणांमुळे लावली जाते. वर गाळून घेतलेले गरम जेल त्यात चाळून घेतलेली मेहेंदी पावडर मिक्स करायची आहे. यामुळे केसांना फाटे फुटणार नाहीत.

हे वाचा:   एक आवळा असा वापरा.! कसलीही खाज, खरूज कायमची दूर होईल.! दोन रुपयाचा हा उपाय तुमचे आयुष्य बदलून टाकेल.!

तुमचे केसं सिल्की चमकदार होतील. मिश्रण असे एकजीव करा की त्यात कोणत्याही गाठी राहणार नाहीत. याची स्मुथ पेस्ट बनवा. केसांवर ब्रशच्या मदतीने नीट लावा. सुमारे ४०-४५ मिनिटे हे आपल्याला केसांवर लावून ठेवायचे आहे. नंतर नॉर्मल पाण्याने केसं स्वच्छ धुवून टाका. तुम्ही दुसऱ्या दिवशी शांपू ने केसं धुतली तरी चालतील. त्याच दिवशी शांपू वॉश करू नका.

अशाप्रकारे तुम्ही कोणत्याही पार्लर मध्ये न जाता स्वस्तात घरच्याघरी हा सोपा उपाय करू शकता. ९०% केसांच्या तक्रारीवर नैसर्गिकपणे सहज उपचार करू शकता. अधिक प्रभावासाठी आठवड्यातून दोनदा हा उपाय नक्की करून बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *