घसा इन्फेक्शन गायब.! सर्दी खोकला झाला तर पटकन करा हा उपाय.! प्रतिकारशक्ती दुप्पट होईल.! रामबाण उपाय.!

आरोग्य

मित्रांनो वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी कफ खोकला घसा खवखवणे हे त्रास हमखास होतात. यासाठी शिंका येणे घसा खवखवणे नाक गळणे अशी लक्षणे दिसू लागताच त्वरित उपचार करावेत. मुळात आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल तर असे आजार वारंवार होत नाहीत. त्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.

तरीदेखील असे आजार झाल्यास पुढील प्रमाणे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 30 ते 40 तुळशीची पाने, जिरे, लवंग, खडीसाखर, मिरी, धणे, बडीशेप सर्वकाही दीड चमचे, दोन-तीन दालचिनीचे तुकडे, पाच-सहा वेलची, थोडासा भीमसेन कापूर.. असे सगळे साहित्य गोळा करा. तिथे आपल्या घरी सहज आढळते. एका पातेल्यामध्ये चार कप पाणी घेऊन त्यामध्ये वरील सर्व वस्तू घाला.

हे पाणी दोन कप होईपर्यंत उकळून घ्या. गॅस मंद आचेवर असू द्या. दोन कप झाल्यानंतर हा गरमागरम काढा पिण्यासाठी तयार. गाण्याच्या मदतीने गाळून हा काढा गरमच प्या. यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढून सर्दी ताप खोकला दूर राहतील. लक्षात घ्या, शरीरामध्ये त्रिदोषांचे संतुलन बिघडल्यास असे आजार वरचेवर होतात. अतिप्रमाणात गोड खाणे, आईस्क्रीम, शीतपेय असे वारंवार पिणे.

हे वाचा:   चमचाभर मीठ करेल जादू.! घरातल्या त्रासदायक माशा भरभर कमी होतील.! किचन मध्ये रोज एका कोपऱ्यात ठेवा एकही माशी फिरकणार नाही.!

शिकरण दही यांसारखे पदार्थ रात्री खाणे यामुळे देखील असे रोग वाढीस लागतात. तेव्हा नुकसान पोहोचतील अशा सवयींना करा बाय बाय. एकदा पाऊस सुरू झाला की सर्दी-पडसे हे घरोघरी सुरू होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये तर जास्त काळजी घेतली पाहिजे. आंबट, अति तिखट, तेलकट तसेच बाहेरचे खाणे टाळावे. दररोज कोमट पाणी पिणे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भागच बनवा.

आता आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आणिक एक उपाय सुचवत आहोत.. अनेक जणांना वेगवेगळे काढेल दररोज करण्याचा कंटाळा येतो. तसेच ते थोडे कठीणही काम असते रोज करण्यासाठी. त्यावर एक पर्याय म्हणून हा उपाय. सकाळी रिकाम्या पोटी एक आणि रात्री झोपताना एक असे गरम पाण्यासोबत हा उपाय तुम्ही करायचा आहे. हा उपाय म्हणजे कोणताही काढायला नसून गोळ्या आहेत.

यावर शॉर्टकट उपाय म्हणजे या गोळ्या. ज्या तुम्ही घरी बनवणार आहात. त्याची पद्धत पुढील प्रमाणे. गुळ- 1/4कप, सुंठपावडर -1चमचा, दालचिनी पावडर -1चमचा, लवंग-3-4 ओवा-1चमचा, मिरपूड -1चमचा, अडुळसा पावडर 1चमचा आणि ज्येष्ठ मध पावडर 1चमचा, हळद-2 चमचे तसेच सर्व साहित्य जमा करा. गुळ सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.

हे वाचा:   मूतखडा चा जालीम उपाय.! दहा मिनिटात मुतखडा बाहेर.! कधीच होणार नाही मुतखड्याचा त्रास.!

नंतर त्यात गुळ मिक्स करून एकदा मिक्सरमधून काढून घ्यावे… हरभरा एवढ्या गोळ्या बनवून बारीक साखरेत घोळवून ठेवाव्यात… नक्की करून बघा आणि तुमची इम्युनिटी पावर वाढवा. आशा आहे आम्ही दिलेल्या टिप्स आणि उपायांचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तुम्ही हे उपाय अवश्य करून बघा आणि हे उपाय आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *