मित्रांनो थंडीची चाहूल मिळताच ओठ खराब होऊ लागतात. तसेच लिपस्टिक चा अतिवापर यामुळे ही ओठ खराब होतात. अश्या वेळी आपण बाजरातील महागडी भेसळयुक्त उत्पादन वापरतो. आणि आपले ओठ अजूनच खराब होण्याची शक्यता असते. अश्या वेळी हा उपाय जर आपल्याला घरगुती प्रमाणे करता आला तर? आज आपण पाहणार आहोत आपले ओठ चमकदार मुलायम आणि गुलाबी कसे ठेवायचे?
या उपायासाठी आपल्याला व्हॅसलीन जेली लागणार आहे. एक काचेचे बाऊल घ्या. एक चमचा व्हॅसलीन जेली घ्या. पुढे एक लिंबू कापून घ्या. व त्या एका लिंबाचा रस बाऊल मध्ये घाला. एक चमचा खोबरेल तेल घाला. या तीनही घटकांमुळे ओठ मऊ पडतात. लिंबा मध्ये विटामिन सी असल्यामुळे ओठावरील काळे डाग कमी होऊ लागतात.
दुसरे एक मोठे बाऊल गरम पाण्याने भरून घ्या. त्यात आधीचे मिश्रण असलेले बाउल ठेवा. आणि चमच्याने मिश्रण हलवत रहा. मिश्रण एकजीव करून घ्या. यामुळे व्हॅसलीन सुद्धा खोबरेल तेलात मिक्स होऊन घट्ट राहणार नाही. 15-20 मिनिटे मिश्रण फेटल्यावर बाऊल वेगळे करा. तुम्हाला ओठांवर लावायची जेली घरच्याघरी तयार.
ही घरगुती नैसर्गिक पदार्थ वापरून तयार केलेली जेली तुमच्या ओठांवर तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ लावा. यात नैसर्गिक घटक असल्याने तुमच्या ओठांना कोणतेही नुकसान नाही. सुंदर गुलाबी ओठ सगळ्यांचेच स्वप्न असते. लिप्स्टिक न लावता देखील या उपायांमुळे तुमचे ओठ गुलाबीसर दिसू लागतील.
15 मिनिटे हे ओठांवर लावा आणि नंतर नॉर्मल थंड पाण्याने ओठ स्वच्छ धुवा. उरलेले जेलीचे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. टीप : चांगल्या रिझल्ट साठी तुम्ही हे मिश्रण सलग पाच ते सहा आठवडे लावावे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.