प्रत्येकालाच वाटते की आपण सुंदर दिसावं. सगळ्यांमध्ये उठून दिसावं. सगळ्यांनी आपल्याकडे बघत राहावं. वय कितीही असलं तरी लहान दिसावं. त्यासाठी आपण आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घेत असतो. वेगवेगळ्या क्रीम, लोशन लावत असतो.
चेहऱ्यावर कोणत्याही कारणांमुळे सुरकुत्या पडतात. चेहरा निस्तेज दिसू लागतो. काहींना कामाच्या स्वरुपामुळे उन्हात सतत वावरावे लागते. उन्हामुळे तुमची त्वचा काळवंडते.
अधिक चटकदार, चमचमीत, तिखट, तेलकट पदार्थ तुमच्या पोटात गेले तर त्याचे परिणाम तुमच्या चेहऱ्यावर चटकन दिसून येतात. म्हणूनच आज आपण बघणार आहोत एक असा उपाय ज्यामुळे तुम्ही अधिक तरुण दिसाल. त्यासाठी आपल्याला लागणार आहे केळीची साल. केळी स्वच्छ धुऊन त्याची साल काढून घ्यावी. आणि सालीचे तुकडे करून घ्यावेत. आता यात 1 चमचा तांदूळ टाकावे.
एका भांड्यात 1 ग्लास पाणी घेऊन त्यात केळ्याच्या सालीचे तुकडे आणि तांदूळ टाकावे. आणि हे उकळून घ्यावे. हे मिश्रण उकळल्यानंतर ते पूर्णपणे शिजवून गाळणीने गाळून घ्या. आता या गाळून घेतलेल्या मिश्रणामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. आणि 1 चमचा कारण स्टार्च टाका. हे सर्व एकत्र करा आणि त्यात दूध पावडर टाका. हे मिश्रण तयार झाल्यावर ते क्रीम सारखे दिसेल. हे तुम्ही एका बाटलीत ठेवू शकता.
हे एक महिन्यापर्यंत तसेच राहते. हे मिश्रण चेहऱ्यावर आठवड्यातून एकदा तरी लावावे. आणि ते सुकू द्यावे. सुकल्यानंतर ते हळू हळू पाण्याने धुऊन काढावे. तुम्हाला चेहऱ्यावर फरक जाणवेल. तुमची त्वचा तजेलदार आणि नितळ होईल. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या या उपायाने निघून जातील.
केळ्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने डाग दूर होतात. तसेच त्वचेमध्ये चमक येते. केळ्याच्या सालीमधील पांढरे धागे काढून त्यात अॅलोव्हेरा जेल मिसळा.
याने डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतील.
त्वचेचा रंग उजळण्यासाठी तसंच त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, फार पूर्वीपासून तांदळाच्या पाण्याचा उपयोग केला जात आहे. यामध्ये खनिज, व्हिटॅमिन, अमिनो अॅसिड आणि अँटी ऑक्सिडेंट्सचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. हे सर्व घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहेत. कॉर्न स्टार्च चेहऱ्याला स्वच्छ करण्यात मदत करते. त्वचेवर लिंबाचा चांगला परिणाम होतो.
नैसर्गिक अॅंटीसेप्टिक गुणधर्मांमुळे लिंबू त्वचा समस्यांवर फारच गुणकारी ठरते. कारण लिंबात मुळातच नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. त्यातील लाइटनिंग एजेंटमुळे त्चचेवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे अनेक सौंदर्य उत्पादनात लिंबाचा वापर केला जातो. लिंबामुळे तुमची त्वचा उजळ तर होतेच शिवाय त्यामुळे सनबर्न सारख्या अनेक समस्या दूर होतात.
हा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.