आपले दात हा आपल्या साठी अतिशय महत्वाचा अवयव मानला जातो. दातांची निगा राखणे हे आपले खूप महत्वाचे कर्तव्य आहे. एकदा जर दात पडला तर पुन्हा दात आपल्याला मिळत नाही.! अशावेळी जर आपण दाता कडे व्यवस्थित लक्ष दिले नाही तर यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अनेक वेळा आपल्या हिरड्या मधून देखील रक्त येत असते. अशा वेळी त्याची काळजी घेणे देखील खूप गरजेचे आहे.
तसे बघायला गेले तर, हिरड्यांमधून रक्त येण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु अयोग्य ब्रशिंग, प्लाक जमा होणे, घाण काढण्यासाठी दात फ्लॉस करणे, दातांना इजा होणारे अन्न खाणे किंवा जीवनशैलीशी संबंधित काही गोष्टी यामागे मुख्य कारण असू शकतात. अशा परिस्थितीत हिरड्यांमधून थोडेसे जरी रक्त आले तर ते ठीक करण्यावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे.
यावर आपण काही घरगुती उपाय करू शकता जेणेकरून तुम्हाला याचा त्रास कमी होईल. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला याबाबतची सविस्तर अशी माहिती देणार आहोत. तर यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून याने हिरड्या स्वच्छ धुवल्यानंतर तुमच्या हिरड्यांना आराम मिळेल. हिरड्यांमधून होणारा रक्तस्राव थांबेल आणि सूज आल्याने होणारा त्रासही कमी होईल. हा उपाय दिवसातून 4-5 वेळा करावा.
हळद अनेक विकारावर गुणकारी ठरू शकते. यासाठी देखील हळदीचा खूपच चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल. हळदीमध्ये असलेले गुणधर्म शरीराच्या इतर भागांप्रमाणेच हिरड्यांनाही लाभ देतात. हळदीची पेस्ट हिरड्यांवर चोळा आणि 10 मिनिटे ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. असे दिवसातून २-३ वेळा करा, हिरड्यांना आराम मिळेल.
यासाठी आणखी एक साधा सोपा आसा उपाय करता येईल जो हिरड्या साठी अतिशय उपयुक्त मानला जातो. यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता भासत असते जे सहज पने आपल्या घरात आपल्याला मिळून जातील. यासाठी नारळ तेल उपयुक्त ठरेल. नारळाच्या तेलाने मालिश दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तोंडातील जंतू, प्लाक आणि पायरियाची समस्या दूर होते. हे तेल तोंडाचे आरोग्य राखते.
मधा सारखा उत्तम पदार्थ यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो. मधाने हिरड्यांना मसाज केल्याने रक्तस्त्राव आणि सूज येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. मधातील दाहक-विरोधी गुणधर्म एका हिरड्यातून दुसऱ्या हिरड्याला होणारा संसर्ग रोखतात. मिठाच्या पाण्याचा नियमित वापर हा हिरड्यांमधून रक्त येण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे.
मिठात दाहक-विरोधी आणि जंतुनाशक गुणधर्म असतात जे हिरड्यांमधील जळजळ आणि संसर्ग कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. कोमट पाण्यात काही प्रमाणात मीठ मिसळा आणि स्वच्छ धुवा. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हे दिवसातून 2-3 वेळा करू शकता. ब्रश करण्याव्यतिरिक्त काही खाल्ल्यानंतरही हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या असेल तर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही लिंबूपाणीची मदत घेऊ शकता.
ही रेसिपी फॉलो करणे खूप सोपे आहे. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळा. आता या पाण्याने स्वच्छ धुवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.