आंघोळ करण्यापूर्वी फक्त एकदा लावा.! डोक्यावरचे सफेद केस काळे कुळकुळीत बनतील.! केसांना काळे करण्याचा घरगुती जुगाड.!

आरोग्य

काळेभोर दाट केस सगळ्यांनाच आवडतात. आपल्या व्यक्तीमत्तावाला शोभा आणण्यासाठी केस खूप महत्त्वाचे असतात. काहीवेळा आनुवंशिकतेमुळे सुद्धा आपले केस पांढरे होतात. तसेच, केस पांढरे पडण्याचे कारण बदलती जीवनशैली आहेच कारण अनेक कारणे यातच दडलेली आहेत. जसे की टेन्शन घेणे, सतत ताण तणावात राहणे, चुकीचा आहार घेणे, व्यसन करणे अशी एक ना अनेक कारणे केस पांढरे होण्याला कारणीभूत असू शकतात.

सफेद होणा-या या केसांना कंट्रोल केलं जाऊ शकतं आणि पुन्हा नव्याने सफेद केस मिळवता येऊ शकतात, ते सुद्धा एकदम नैसर्गिक पद्धतीने! मेहंदी किंवा इतर रासायनिक उत्पादने न वापरता केस काळे कसे करावेत हे आज आपल्याला बघायचे आहे. या उपायसाठी आपल्याला पाहिजे तीन ते चार चमचे दही, मेथीच्या दाण्यांची पूड, संत्राचा रस किंवा आवळ्याचा रस किंवा लिंबाचा रस, व्हिटॅमिन इ ची गोळी, कॉफी पावडर.

हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्या. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं आपल्या केसांवर लावावे. आणि 20 मिनिटानंतर केस व्यवस्थित धुवावेत. हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा. यामुळे आपणास लवकर परिणाम दिसेल. दही वापरल्याने केसांना नैसर्गिक ब्राउन चमक येते. तसेच केस अधिक लांबसडक आणि घनदाट होतात. तसेच केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते.

हे वाचा:   बाभळीचे तीन पाने.! असे गुडघ्याला लावा.! मिळतील थक्क करून सोडणारे फायदे.! आता करा गुडघे दुखीवर शेवटचा इलाज.!

आणि केसगळतीची समस्या देखील कायमची दूर होण्यास मदत मिळते. मेथीचे दाणे गळत्या केसांवर तसेच अवेळी केस पांढरे झाल्यास त्यावर गुणकारी आहेत. संत्र्याचा रस, आवळ्याचा रस किंवा लिंबाचा रस आपण केसांना व्हिटॅमिन सी साठी वापरणार आहोत. शरीरात कोलेजनचे उत्पादन करण्यासाठी व्हिटॅमिन सी उपयुक्त असते. केसांच्या वाढीसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.

आवळा, संत्री , लिंबूस्ट्रॉबेरी, काळी मिरी, पेरु आणि आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. या मध्ये आपण व्हिटॅमिन इ ची गोळी वापरत आहोत. जी सहज पणे बाजारात उपलब्ध असते. व्हिटॅमिन ईमुळे तुमच्या त्वचेखालील रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होते. केसांच्या योग्य वाढीसाठी त्वचेला व्हिटॅमिन ईचा योग्य प्रमाणात पुरवठा होणं गरजेचं आहे.

हे वाचा:   चेहऱ्यावर किंवा मानेवर असणारी जामखीळी रात्रीतून गायब होईल.! इतका सोपा उपाय कोणी नाही सांगणार.!

मात्र लक्षात ठेवा व्हिटॅमिन ईचा ओव्हर डोस घेतल्यास त्याचे दुष्परिणामदेखील भोगावे लागू शकतात. कॉफी केवळ तुमचे केस मजबूत करत नाही तर केस मऊ आणि चमकदार बनवते. कॉफीमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे सुस्ती आणि कोरडेपणाशी लढतात. शिवाय केसांचा रंग सुद्धा कॉफी पावडर मुळे गडद होतो. कॉफी वापरल्याने टाळूचे डिटॉक्सिफाईंग होण्यास मदत होते.

जेणेकरून त्वचेच्या पीएच पातळीमध्ये समतोल होतो. ज्यामुळे केस गळतीची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *