मित्रांनो आज आम्ही तुम्हाला हिरवी मिरची खाण्याचे फायदे-तोटे, बंधन, पथ्य याबद्दल सर्व काही माहिती देणार आहोत. पित्त प्रकृती असणाऱ्यांनी हिरवी मिरची खाताना खूप सावधगिरी बाळगले पाहिजे. पित्त प्रकृती असणाऱ्यांच्या शरीरामध्ये आधीच खूप गर्मी असते. यावेळी हिरवी मिरची खाताना काय काळजी घ्यावी हे आपण बघू.
आपली बदलत्या जीवनशैलीमुळे आपला आहारही बदलत आहे. योग्य व सकस आहार न मिळाल्यामुळे शरीर अस्वस्थ होत आहे. फास्ट फूड, जन्क जंक फूड, चॅट हे खाताना खूप छान लागते परंतु हे पदार्थ आपली तब्येत खूप खराब करते. याची आपल्याला जाणीव असून सुद्धा आपण त्याकडे कानाडोळा करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पुरेशी झोप येत नाही.
रात्री 10 ते सकाळी 5 तुम्ही तुमच्या शरीराला आराम दिला तर तुमचे शरीर डिटॉक्स होऊन तुम्ही निरोगी व्हाल. खाणं नीट नाही. रात्री पुरेशी झोप नाही, सकाळी वेळेत उठणे नाही की व्यायाम नाही यामुळे तुमच्या तब्येतीची पूर्ण हेळसांड होते. केसं गळणे, सफेद होणे, थकवा येणे यामुळे सगळे असे त्रास उद्भवतात.
आयुर्वेदामध्ये हिरवी मिरची खाण्याचे खूप सारे फायदे सांगितले आहेत. फायद्या सोबत आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ या प्रवृत्तींना डोळ्यासमोर ठेवून कोणी कोणी हिरवी मिरची खाल्ली पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे आणि कोणी हिरवी मिरची अजिबात खाल्ली नाही पाहिजे.
ज्यांना खूप राग येतो, ताण-तणाव डिप्रेशन समस्या आहे, ज्यांचे लवकर केस सफेद होत आहेत, कमी वयामध्ये जे वृद्ध दिसत आहेत, पोटदुखी आणि डोकेदुखी ज्यांना खूप प्रमाणात असते, त्यांचे पोट साफ होण्यास त्रास होतो त्यांनी हिरव्या मिरचीचा वापर अजिबात करू नका. थोडक्यात पित्त प्रकृतीच्या लोकांनी हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर यांचे सेवन करु नये.
मूळव्याधीच्या रोगामध्ये हिरवी मिरची वर्ज्य होय. ज्यांच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर छोटे-छोटे पिंपल्स आहेत, ऑईली स्किन ज्यांची असते त्यांनी हिरव्या मिरचीचे सेवन करू नये. तामसिक भोजनामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला जातो. हिरव्या मिरचीचा सेवनाने स्वभावही चिडचिडा बनतो. शांत स्वभाव ठेवायचा असल्यास तुम्ही आहारात हिरव्या मिरचीचे प्रमाण कमी करा.
डोळ्यांची नजर कमजोर असलेल्यांनी हिरव्या मिरचीचा थोड्याफार प्रमाणात प्रयोग केल्या पाहिजे. जे लोकं पहाडी थंडी भागात राहतात त्यांनी थंडीत हिरव्या मिरचीचा आवर्जून वापर केला पाहिजे. त्यामुळे शरीर ऊबदार गरम राहते. कब्ज, पोट साफ न होण्याची ज्यांना समस्या आहे त्यांनी आठवड्यातून एकदा खूप प्रमाणात मिरची खाल्ल्याने पोट साफ होईल.
( रोज करू नये ) ऋतु बदलामुळे थोडे सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन झाले असल्यास तर तुम्ही घरी कोणतेही सूप बनवून त्यात रात्री झोपताना जास्त हिरवी मिरची टाकून सेवन करावे. कफ प्रकृतीत मिरची उत्तम आहे. हिरव्या मिरचीच्या सेवनाने आपले रक्ताभिसरण चांगले होते. लाल मिरची पावडरीच्या सेवनापासून दूर रहावे.
माहिती आवडल्यास प्रयोग करून पहा आणि आपल्या आवडत्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद!!
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.